4th September 2022 Important Events : विविध सणवारांचा ऑगस्ट महिना संपून आजपासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यात गणपतीचे आगमन झाले आहे. घरोघरी गणपती विराजमान झाले आहेत. तसेच पितृपक्ष पंधरवडा सुद्धा याच महिन्यात येतो. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 4 सप्टेंबरचे दिनविशेष.
भारतीय स्वातंत्र्यसेनानी नेते दादाभाई नौरोजी यांचा जन्म.
दादाभाई नौरोजी - भारतीय स्वातंत्र्यसेनानी असलेले दादाभाई नौरोजी हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहीलेल्या पॉव्हर्टी अॅन्ड अन्-ब्रिटीश रूल इन इंडिया या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले होते.
1882 : थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालू केले. वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.
1937 : व्हेनिसमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ’प्रभात’च्या ’संत तुकाराम’ या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली. इतर दोन चित्रपट होते ऑस्ट्रेलियाचा ’फ्लाइंग डॉक्टर’ आणि हंगेरीचा ’मारिया नोव्हेर’.
1941 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म.
सुशीलकुमार संभाजीराव शिंदे हे भारतीय मराठी राजकारणी आहेत. 16 जानेवारी, 2003 ते 1 नोव्हेंबर, 2004 या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तसेच 2004 ते इ.स. 2006 या कालखंडात ते आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात असून मनमोहनसिंग मंत्रिमंडळात भारताचे गृहमंत्री होते. सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला. सलग साडेसहा वर्ष केंद्रीय ऊर्जामंत्री पदावर राहणारे आणि लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते पहिले मराठी नेते आहेत.
1952 : अभिनेते ऋषी कपूर यांचा जन्म.
ऋषी कपूर हे एक भारतीय सिने अभिनेते आणि दिग्दर्शक होते. 1970 सालच्या 'मेरा नाम जोकर' या चित्रपटात छोटी भूमिका करणाऱ्या ऋषी यांनी 1973 साली 'बॉबी' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली 40 वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या ऋषी यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. तसेच त्यांनी अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे.
1998 : गुगल स्थापना दिवस
गूगल कंपनी विशेषतः आंतरजाल-शोध आणि आंतरजाल-जाहिराती या क्षेत्रांत सेवा पुरवते. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींसाठी वापर केला जाणाऱ्या Google ची स्थापना 4 सप्टेंबर 1998 रोजी लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी केली. त्यावेळी ते कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठात पीएचडीचे विद्यार्थी होते .
1997 : पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवी, लेखक, नाटककार आणि थोर सामाजिक विचारवंत तसचं, धर्मयुग या लोकप्रिय हिंदी साप्ताहिक मासिकाचे माजी मुख्य संपादक धर्मवीर भारती यांचे निधन.
महत्वाच्या बातम्या :