2nd June 2022 Important Events : जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 2 जून चे दिनविशेष.


1800 : कॅनडात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.


2014 : तेलंगण भारताचे 29वे राज्य झाले.


तेलंगणा भारताचे 29 वे राज्य असून 2 जून 2014 रोजी स्थापन झाले. हे राज्य पूर्वी आंध्र प्रदेशचा भाग होते. या प्रदेशाची प्राचीन नावे तेलिंगाण, तेलिंगा, त्रिलिंग अशी होती. तेलंगणा भौगोलिकदृष्ठ्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर कर्नाटक यांच्या सीमांलगत आहे.


1955 : चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा जन्म.


दाक्षिणात्य मनोरंजन विश्वापासून ते बॉलिवूडपर्यंत, आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर खोल छाप सोडणारे ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक मणिरत्नम यांचा जन्मदिन आहे. दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथाकार असलेले मणिरत्नम यांनी एकापेक्षा एक सरस हीट चित्रपट दिले आहे. बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवत त्यांनी गुरु, युवा यांसारखे दखल घेण्याजोग्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.


1988 : भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक राज कपूर यांचे निधन. 


राज कपूर हे हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते. 2 जून 1988 रोजी त्यांचे निधन झाले. राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि भाऊ शम्मी कपूर आणि शशी कपूर हेही चित्रपट अभिनेते होते. त्यांना बॉलीवूडमधील शोमॅन म्हणून ओळखले जाते. राज कपूर यांना 1987 साली दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील राजबाग (लोणी काळभोर) येथील बंगल्यामध्ये राज कपूर यांचे स्मारक आहे. 


1896 : गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी ’रेडिओ’चे पेटंट घेतले.


महत्वाच्या बातम्या :