29th July 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. आज 29 जुलै. म्हणजेच भारतीय हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना. आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. विविध सण, व्रतवैकल्ये आणि उत्सवाच्या या महिन्यात सगळीकडे आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 29 जुलैचे दिनविशेष.


29 जुलै : श्रावण मासारंभ


भारतीय हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचव्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाल्याचे सांगितले जाते. शुक्रवार, 29 जुलै 2022 रोजी श्रावण मासारंभ आहे. श्रावणामध्ये दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा, सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे.


29 जुलै : International Tiger Day


जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी 29 जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. 29 जुलै 2010 रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. दरवर्षी 29 जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक यंत्रणेला चालना देणे आणि व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती करणे हे प्राथमिक लक्ष्य आहे. शिकार आणि बेकायदेशीर व्यापार तसेच अधिवास गमावल्यामुळे वाघांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मानवी गरजांसाठी जंगलांची तोडणी कमीत कमी केल्यास जंगलांची बचत होईल ज्यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासात बचत होईल. म्हणूनच जागरूकता वाढवून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व्याघ्रदिन साजरा केला जातो.


1987 : भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे. आर. जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या केल्या.


1904 : साली भारतातील सर्वोच्च पदक भारतरत्न पुरस्कार विजेता आणि पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय उद्योगपती व वैमानिक,तसचं, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे. आर. डी. टाटा यांचा जन्मदिन.


2002 : साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रीयन मराठी सुगम संगीताचे प्रतिक म्हणून आपली ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट गायक-संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे निधन.


महत्वाच्या बातम्या :