25th June 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 25 जूनचे दिनविशेष.


1869 : महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांचा जन्म 


दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म हरिभाऊ चाफेकर या एका कीर्तनकारांच्या घरी 25 जून 1869 रोजी झाला. दामोदरवर लहानपणापासूनच लोकमान्य टिळकांच्या विचारांचा प्रभाव होता.22 जून 1897 रोजी पुण्यातील गणेशखिंडीत दामोदरपंतांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वॉल्टर चार्ल्स रँड आणि आयर्स्टचा वध केला. इंग्रजांनी दामोदरपंतांना 18 एप्रिल 1898 रोजी पुण्यातील येरवडा तुरूंगात फाशी दिली. 


1924 : संगीतकार मदन मोहन यांचा जन्म  
मदन मोहन यांचे पूर्ण नाव मदन मोहन कोहली असे आहे. त्यांचा जन्म 25 जून 1924 रोजी बगदाद, इराक येथे झाला. मदन मोहन यांचे वडील रायबहादूर इराकमध्ये कामाला होते. 1932 साली त्यांचे कुटुंब भारतात परत आले आणि मदन मोहन यांची रवानगी पंजाब मधील चाकवाल या त्यांच्या मूळच्या गावी झाली.   त्यांचे वडील व्यवसायाच्या शोधात मुंबईला गेले. लखनऊ, मुंबई आणि देहरादून या शहरात शिक्षण पूर्ण करून मदन मोहन सैन्यात भरती झाले. मात्र, त्यांचे संवेदनशील मन सैन्यात रमले नाही आणि 1946 साली संगीतात काही करावे या उद्देशाने त्यांनी सैन्यातील नोकरी सोडली.


सैन्य दलातील नोकरी सोडल्यानंर मदन मोहन यांना ऑल इंडिया रेडियोत नोकरी मिळाली आणि लखनौ आकाशवाणीवर ते रुजू झाले. तेथे त्यांची गाठ उस्ताद बिस्मिल्लाह खान आणि उस्ताद फैय्याज खान यांच्यासारख्या महान संगीतकारांशी पडली. फिल्मी दुनियेत मदन मोहन यांची सुरुवात गायक म्हणून झाली १९४८ साली ‘शाहीन’ चित्रपटात. मास्टर गुलाम हैदर यांचे संगीत होते आणि लता मंगेशकर यांच्या बरोबर त्यांनी दोन युगल गीते गायली. 


1931 : माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जन्म 
जी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जन्म  25 जून 1931 रोजी  अलाहाबाद जिल्ह्यातील बेलन नदीच्या काठी वसलेल्या दैया येथे राजपूत जमीनदार घराण्यात झाला. सिंग हे 1969 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेवर सोरांव येथून काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून निवडून गेले. 1971 मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले आणि 1974 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाणिज्य उपमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली. 1976 ते 77 मध्ये त्यांनी वाणिज्यमंत्री म्हणून काम पाहिले.


1980  मध्ये इंदिरा गांधी जनता सरकारच्या कार्यकाळानंतर पुन्हा निवडून आल्या त्यावेली त्यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. सिंग यांनी 2 डिसेंबर 1989 रोजी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. सिंग यांनी 2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990 या काळात एक वर्षापेक्षा थोडा कमी काळ पदाची धुरा सांभाळली.


1974 : हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा जन्म 
करिश्मा कपूरचा  जन्म 25 जून 1974 रोजी जाला. 1991 साली करिश्माने चित्रपटसॄष्टीत पदार्पण केले. करिश्माने कारकिर्दीत अनेक यशस्वी व्यावसायिक चित्रपटांतून कामे करत 1990 च्या दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवले. तिने भूमिका साकारलेल्या चित्रपटांपैकी राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है, फिजा , झुबैदा  हे चित्रपट विशेष गाजले.


1986 : अभिनेत्री सई ताम्हनकरचा जन्म 
सई ताम्हणकरचा जन्म 25 जून 1986 रोजी झाला. सई ताम्हणकर या मराठी-हिंदी चित्रपट सृष्ंटीतील एक नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री आहे. बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत ओळखले जाते. सई मूळची  सांगलीतील आहे.  प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.  
 
1978 : हिंदी चित्रपट अभिनेता आफताब शिवदासानी यांचा जन्म
 
1864 : नोबेल पारितोषिक विजते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर नेर्न्स्ट यांचा जन्म 


1900 : भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व्हाइसरॉय लुई माउंट बॅटन यांचा जन्म 
 
1903 : इंग्लिश लेखक जॉर्ज ऑरवेल यांचा जन्म 


1907 : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जे.हान्स डी. जेन्सेन यांचा जन्म 
1991 : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म 
 
1915 : भारतीय लष्करी सल्लागार काश्मीर सिंग कटोच यांचा जन्म 


1928 : द स्मर्फ चे निर्माते पेओ यांचा जन्म 


1928: नोबेल पारितोषिक विजेते रशियन भौतिकशास्त्रज्ञ अलेक्सेई अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह यांचा जन्म 


1975 : रशियन बुद्धीबळपटू व्लादिमिर क्रामनिक यांचा जन्म 
  
1922 : बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन 
सत्येंद्रनाथ दत्त यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1882 रोजी झाला. प्रख्यात बंगाली कवी अक्षयकुमार दत्त यांचे सत्येंद्रनाथ हे नातू होते. सत्येंद्रनाथांनी विद्यार्थिदशेतच काव्यलेखन सुरू केले होते. 1899 ते 1903 या काळात त्यांनी चार वेळा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. परंतु ते शिक्षण त्यांच्या मनाला पटत नसे. मात्र ज्ञानविज्ञानविषयी त्यांना आस्था होती. सविता (१९००), वेणु ओ वीणा (१९०६), होमशिखा (१९०७), फुलेर फसल (१९११), कुहु ओ केका (१९१२), तुलिर लिखन  (१९१४), अभ्र–आबीर  (१९१६), हंसतिका (१९१७), बेलाशेषेर गान  (१९२२), बिदाय आरती (१९२२) इ. त्यांचे एकूण पंधरा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.  
 
1971 : स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ जॉन बॉइडऑर यांचे निधन 
  
1979 :  पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब यांचे निधन 
 1995 : नोबेल पारितोषिक विजेते आयरिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्टथॉमस सिंटन वॉल्टन यांचे निधन 
1997 : फ्रेंच संशोधक जॅक-इवेसकुस्तू यांचे निधन 
2000 : मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या रवीबाला सोमण-चितळे यांचे निधन 
2009 : अमेरिकन गायक मायकेल जॅक्सन यांचे निधन 
 


महत्वाच्या घटना
 
1918 : कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला.
 
1934 : महात्मा गांधी यांना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला होता.
 
1940 : दुसरे महायुद्ध: फ्रांसने औपचारिकरित्या जर्मनीला आत्मसमर्पण केले 
 
1947 : द डायरी ऑफ अॅनी फ्रँक प्रकाशित झाली 
 
1975 : पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली 
 
1975 : मोझांबिकला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले 
 
1983 : भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली 
 
1993 : किम कॅंपबेल यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली 
 
2000: मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्‍चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले