25th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. आणि ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 25 ऑगस्ट. श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते ह्या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा करून शेवटी दही-भाताचा नैवेद्य दाखवावा. हे व्रत सात वर्षे केले जाते. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 25 ऑगस्ट दिनविशेष.


बृहस्पती पूजन :


श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते ह्या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा करून शेवटी दही-भाताचा नैवेद्य दाखवावा. हे व्रत सात वर्षे केले जाते. 


1923 : साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्म.


1923 : प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, साहित्यक, समीक्षक आणि अर्थतज्ञ तसचं, 56 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर गाडगीळ यांचा जन्मदिन.


1609 : इटालियन खगोलशास्त्रज्ञ गॅलेली गॅलीलियो यांनी वेनेशियन व्यापार्‍यांना आपली नवीन निर्मिती, दुर्बिणीचे प्रात्याक्षिक दाखविले.


गॅलिलिओने (Galileo Galilei) हायड्रोस्टॅटिक तराजू बनविला. गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली. अज्ञात असलेले अनेक ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्बिणीमुळे लागले.


1941 : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांचा जन्मदिन.


अशोक पत्की हे गीतकार आणि संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांना, जाहिरातींना व दूरदर्शन मालिकांना संगीत दिले आहे. आठ हजारांहून जास्त जिंगल्स, चारशे नाटकांचे संगीत, सव्वाशे चित्रपटांना संगीत, 500 मालिकांची शीर्षकगीते त्यांच्या नावावर आहेत. 


1819 : वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक आणि यंत्र अभियंता जेम्स वॅट (James Watt) यांचे निधन.


1867 : विद्युत चुंबकीय यंत्राचा शोध लावणारे ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ मायकेल फॅराडे (Michael Faraday) यांचे निधन.


1908 : नोबल पारितोषिक पुरस्कार सन्मानित किरणोत्सारी वर्गाचा शोध लावणारे महान फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंता हेनरी बेक्वरेल (Antoine Henri Becquerel) यांचे निधन.


2012 : चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे जगप्रसिद्ध अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग (Neil Armstrong) यांचे निधन.


महत्वाच्या बातम्या :