22nd August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. आणि ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 22 ऑगस्ट. श्रावणी सोमवार या संदर्भात ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 22 ऑगस्ट दिनविशेष.
श्रावणी सोमवार व्रत :
श्रावणी सोमवार या संदर्भात ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. ह्या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा. शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस ह्यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहावी. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम असावा. ही मूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।। ‘ हा मंत्र म्हणावा. पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन ह्या व्रताची समाप्ती करावी.
सन 1639 साली ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीने तामिळनाडू राज्याची राजधानी मद्रास शहराची स्थापना केली.
सन 2018 साली भारतीय नेमबाज राही सरनोबत यांनी 25 मीटर पिस्तूल शूटिंगमध्ये सुवर्णपदक मिळवून आशियाई खेळांच्या नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
इ.स. 1877 साली पाश्चात्य भारतीय संस्कृतीचे प्रारंभिक भाषांतरकार,इतिहासकार आणि भारतीय कलेचे तत्त्वज्ञ आनंद केंटिश कुमारस्वामी यांचा जन्मदिन.
सन 1920 साली कृत्रिम ह्रुदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद डेंटन आर्थर कूली (Denton Arthur Cooley) यांचा जन्मदिन.
सन 2014 साली ज्ञानपीठ पुरस्कार व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय कन्नड भाषिक लेखक, साहित्यिक, समीक्षक आणि शिक्षणतज्ञ यू. आर. अनंतमूर्ती यांचे निधन.
महत्वाच्या बातम्या :