UPS Layoff 2024 : सध्या विविध क्षेत्रात नोकरकपातीचं संकट दिसून येत आहे. आता आणखी एका दिग्गज कंपनीकडून मोठी नोकरकपात (Layoffs) करण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या पार्सल डिलिव्हरी (Parcel Delivery Company) कंपनी युपीएस (UPS) हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. युनायटेड पार्सल सर्व्हिस (UPS) ही जगातील सर्वात मोठी पार्सल वितरण कंपनी 12,000 कामगारांना कामावरून कमी करण्याची तयारीत आहे. याशिवाय कंपनी आपल्या ट्रक फ्रेट ब्रोकरेज व्यवसाय कोयोटसाठी कठोर निर्णय घेण्याचा विचारात असल्याचंही मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आलं आहे.


युनाइटेड पार्सल सर्विसकडून 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ 


युनाइटेड पार्सल सर्विस (UPS - United Parcel Service) युनायटेड ही जगातील सर्वात मोठी पार्सल डिलिव्हरी कंपनी आहे. युपीएस 12,000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत असल्याचं उघड झालं आहे. युपीएस कंपनी कोयोट, ट्रकलोड फ्रेट ब्रोकरेज व्यवसायासाठी धोरणात्मक पर्यायांचे पुनरावलोकन करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने पूर्ण वर्षाचा महसूल अपेक्षेपेक्षा कमी आल्यानंतर हा मोठा निर्णय घेतला आहे. 


नोकरकपातीचा शेअर बाजारावर परिणाम


12000 कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या बातमीमुळे सर्वच क्षेत्रात खळबळ माजली आहे. गेल्या काही महिन्यात नाईकी, गुगल सारख्या मोठ्या कंपन्यांनीही नोकरकपात केली आहे. सध्या नोकरकपातीची टांगती तलवार बहुतेक क्षेत्रांवर आहे. दरम्यान, नोकरकपातीच्या या बातमीनंतर सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये UPS च्या शेअर्समध्ये 6.3 टक्क्यांची तीव्र घसरण झाली. मुख्य कार्यकारी कॅरोल टोम यांनी सांगितलं की, ''मागील वर्ष कठीण आणि निराशाजनक होतं, UPS ने त्याच्या सर्व व्यवसाय विभागांमध्ये व्हॉल्यूम, महसूल आणि ऑपरेटिंग कमी नफा मिळाला.''


एक अब्ज डॉलर खर्च कमी करण्याचा विचार


युपीएल कंपनीने आता खर्चात 1 अब्ज डॉलर कपात करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. UPS ला 2024 च्या दुसऱ्या सहामाहीपर्यंत चांगल्या व्यावसायिक परिस्थितीची अपेक्षा नाही. कंपनीचा पूर्ण वर्षाचा महसूल 92 अब्ज डॉलर ते 94.5 बिलियन डॉलर दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.


कंपनीच्या व्यवसायात सतत घसरण


कंपनीचे सीएफओ ब्रायन न्यूमन यांनी सांगितलं की, टीमस्टर्स युनियनसोबतच्या नवीन करारामुळे त्याच्या मजुरीचा खर्च वाढत आहे. याशिवाय कंपनीच्या सरासरी ऑर्डर्सही कमी होत आहेत. कंपनीचं ऑपरेटिंग मार्जिन पहिल्या तिमाहीत सर्वात कमी असण्याची अपेक्षा आहे. UPS चा आंतरराष्ट्रीय हवाई-आधारित विभाग आणि ट्रक व्यवसाय चौथ्या तिमाहीत अनुक्रमे 6.9 टक्के आणि 7.3 टक्के घसरला. कंपनीचा तिमाही महसूल एका वर्षापूर्वी 27 बिलियन डॉलरवरून 24.9 बिलियन डॉलरवर घसरला. कंपनीचा नफाही गतवर्षीच्या प्रति शेअर 3.62 डॉलरवरून 2.47 डॉलर प्रति शेअरवर घसरला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Railway Job 2024 : रेल्वेमध्ये बंपर भरती, 5000 हून अधिक रिक्त जागा; अधिक माहिती वाचा