UPSC Recruitment 2022 : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) पुनर्वसन अधिकारी (Rehabilitation Officer) यासह विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तुम्हाला upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरतीसाठी अर्ज करता येईल. युपीएससीकडून (UPSC) थ्रोपोलॉजिस्ट, असिस्टेंट सेंट्रल इंटेलिजंस अधिकारी या पदांसह इतर पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊ अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतात. 


महत्त्वाच्या तारखा
या भरतीसाठी अर्जप्रक्रियेला सुरुवात झाली असून 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.


रिक्त पदांचा तपशील


या भरती अंतर्गत 19 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. UPSC ने जाहीर केलेल्या माहितीनुसार, एंथ्रोपोलॉजिस्ट एक पदं, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स अधिकारीसाठी चार पदांवर भरती केली जाणार आहे. त्याशिवाय वैज्ञानिक 'बी' साठी एक रिक्त जागा, वैज्ञानिक 'बी' फॉरेन्सिक इलेक्ट्रॉनिक्ससाठी (Forensic Electronics) तीन रिक्त जागा आणि सायंटिस्ट 'बी' मानसशास्त्राच्या (Psychology) 03 जागा रिक्त आहेत. त्याच वेळी, पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या चार रिक्त पदं आणि उपसंचालक/प्रादेशिक संचालकांच्या तीन रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे.


शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा


या भरती मोहिमेद्वारे विविध पदांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादाही वेगळी ठेवण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अधिसूचना तपासू शकतात.


कशी अशी असेल निवड प्रक्रिया?


अधिसूचनेनुसार या विविध रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
 
अर्ज कसा कराल?


या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 15 सप्टेंबरपर्यंत upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.