Bigg Boss Marathi 4 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) या कार्यक्रमाच्या तीन सीझन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. गेल्या सीझनचा विशाल निकम (Vishal Nikam) हा विजेता ठरला होता. आता लवकरच या कार्यक्रमाचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) हेच करणार आहे. महेश यांनी बिग बॉस मराठीच्या तीन सीझन्सचे सूत्रसंचालन केले होते. नुकताच या सीझनचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल
बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा प्रोमो कलर्स मराठीच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर यांचा हटके लूक दिसत आहे. डोक्यावर हॅट, निळा कोट आणि मफलर अशा लूकमध्ये महेश मांजरेकर हे दिसत आहेत. 'हिची ना कायम किरकीर असते, हा किती भांडतो, सर तिच्यावर कायम चिडतात, हा सरांचा फेव्हरेट आहे. ही माझी नाही तुमची मत आहेत. बिग बॉस मराठी 4 सुरू होतंय. तुमची मत तयार ठेवा', असं म्हणताना महेश मांजरेकर दिसत आहेत. 'कधी रिलीज होणार आहे', 'आम्ही या सीझनची वाट बघत आहोत' अशा कमेंट्स या प्रोमो व्हिडीओला नेटकऱ्यांनी केल्या आहेत. या सीझनमध्ये कोणते स्पर्धक असतील? हा सीझन सुरु कधी होईल? या प्रश्नांचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.
पाहा प्रोमो:
महेश मांजरेकर दर आठवड्याच्या शेवटी स्पर्धकांची शाळा घेत असतात. त्यांचा वीकेंडचा डाव कार्यक्रमात रंगत आणतो. आठवड्याच्या शेवटी स्पर्धकांची शाळा घेण्यासाठी महेश मांजरेकर 25 लाख रुपये आकारतात अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते बिग बॉस या कार्यक्रमासाठी कोटींच्या घरात मानधन घेत असून नव्या पर्वासाठी त्यांच्या मानधनात आणखी वाढ झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Mahesh Manjrekar : बिग बॉसच्या एका आठवड्यासाठी महेश मांजरेकर किती मानधन घेतात? जाणून घ्या...