नवी दिल्ली : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समधील कॉन्स्टेबल आणि रायफलमन जनरल ड्युटी पदांसाठी 25487 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून राबवण्यात येत आहे. यासाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. कॉन्स्टेबल जीडी पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना वेतनश्रेणी 21700 ते 69100 रुपये या वेतन श्रेणीनुसार पगार मिळेल.
SSC GD Constable Recruitment 2025 : कोणत्या सशस्त्र दलांमध्ये भरती?
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस, सशस्त्र सीमा बल, सेक्रेटरियट सिक्युरिटी फोर्स आसाम रायफल्समधील 25487 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
कोणत्या सशस्त्र दलांमध्ये किती पदांसाठी भरती?
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स: 616केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल:14595केंद्रीय राखीव पोलीस दल: 5490इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस:1293 सशस्त्र सीमा बल: 1764सेक्रेटरियट सिक्युरिटी फोर्स :23आसाम रायफल्समधील :170625487 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
निवड प्रक्रिया :
ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 आहे. त्यानंतर 1 जानेवारीपर्यंत परीक्षा शुल्क भरण्याची मुदत आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट फेब्रुवारी ते एप्रिल 2026 दरम्यान होऊ शकते. त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, वैद्यकीय चाचणी आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी अशा टप्प्यात निवड प्रक्रिया राबवली जाईल. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा मराठी, हिंदी सह 13 भारतीय भाषांमध्ये घेतली जाणार आहे.
वयोमर्यादा
स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे राबवल्या जाणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 23 या वयोगटातील पात्र उमेदवार अर्ज करु शकतात. म्हणजेच 2 जानेवारी 2003 आणि 1 जानेवारी 2008 दरम्यान जन्म झालेले उमेदवार अर्ज करु शकतात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षांची वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. ओबीसींसाठी ही अट 3 वर्ष शिथील करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार कॉन्स्टेबल जनरल ड्युटी पदासाठी अर्ज करु शकतात. या पदासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरुन अर्ज करता येईल. यासाठी वन टाईम रजिस्ट्रेशन करावं लागेल.परीक्षा फी 100 रुपये इतकी आहे. एससी एसटी उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिकांना कोणतीही फी भरावी लागणार नाही. 100 रुपयांचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरावं लागेल.