यवतमाळ : प्रेमप्रकरण, अनैतिक संबंधातून हत्या आणि आत्महत्या सारखे गुन्हे सातत्याने घडत असल्याचं समोर येत आहे. त्यात, अनैतिक संबंधातून (Love) आणि प्रेमप्रकरणातून खून केल्याच्या घटना वारंवार घडत असून यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा (खु) येथे असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या गावातीलच प्रियकराची हत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे. या हत्याकांडानंतर पोलिसांनी (Police) आरोपी पतीला अटक केली. याप्रकरणी, अधिक तपास सुरू आहे.
विशाल जगन रंदई (37) असे मृतकाचे नाव आहे तर निलेश अरुण ढोणे (35) असे आरोपीचे नाव आहे. आपल्या पत्नीशी अंदाजे दोन वर्षांपासून विशालचे अनैतिक संबंध असल्याची चर्चा गावात होती, तसा संशयही निलेशला होता. पत्नीच्या वागणुकीबद्दल त्याला काही दिवसांपासून संशय होता. याच कारणावरुन दोघांमध्ये अनेकदा वाद झाले. मात्र, याबाबत खात्री झाल्यावर आरोपी अरुण ढोणे याने मृतक विशाल रंदईला गावातीलच एका एकांत ठिकाणी बोलावले. त्या ठिकाणी दोघांमध्ये चर्चा होऊन वाद झाला. वादादरम्यान रागाच्या भरात आरोपीने लाकडी दांड्याने विशाल रंदईवर वार केले. त्यामध्ये गंभीर जखमी झालेला रंदई रक्ताच्या थारोळ्यात पडला. अचानक झालेल्या या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास घाटंजी पोलीस ठाण्यातील अधिकारी करीत आहेत.
हेही वाचा
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद