SSC CGL Recruitment 2024 : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job) आहात आणि चांगल्या संधीची वाट पाहत असाल, तर हीच तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) म्हणजेच कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission) हजारो पदांवर बंपर भरती करणार आहे. SSC CGL भरती अंतर्गत 17000 हून अधिक रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हीही ही उत्तम संधी दवडू नका आणि या भरतीसाठी अर्ज करा. या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख, प्रक्रिया, अर्ज कुठे करायचा, अर्जाची फी किती यासंबंधित सर्व माहिती सविस्तर जाणून घ्या.
SSC CGL Recruitment 2024 : SSC CGL भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु
या भरतीसाठी इच्छुक उमेदवार ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात. कर्मचारी निवड आयोगाकडून या आठवड्यात दोन नोकर भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. 24 जूनपासून कंबाइंड ग्रेज्युएट लेवल (SSC CGL) भरतीसाठीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याशिवाय मल्टी टास्किंग नॉन-टेक्निकल स्टाफ (SSC MTS) भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही याच आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहेत.
SSC CGL Recruitment 2024 : महत्त्वाच्या तारखा
SSC CGL भरती अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख :
SSC CGL भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख :
SSC CGL Recruitment 2024 : 17,727 रिक्त पदांवर भरती
SSC CGL भरती मोहिमेसाठी अर्ज प्रक्रिया सोमवार, 24 जूनपासून सुरु झाली आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 27 जून ही शेवटची तारीख आहे. या भरतीची परीक्षा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात आयोजित केली जाऊ शकते. उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात.
SSC CGL Recruitment 2024 : या पदांवर भरती
SSC CGL 2024 भरती मोहिमेद्वारे या वर्षी 17727 पदांची भरती केली जाणार आहे. एसएससीने अधिसूचनेत म्हटले आहे की, SSC CGL 2024 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, अर्जाची लिंक सक्रिय केली गेली आहे. या परीक्षेद्वारे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सरकारी विभागांमध्ये भरती केली जाते. यामध्ये सहाय्यक विभाग अधिकारी, निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपनिरीक्षक, लेखा परीक्षक आणि लेखापाल अशा अनेक पदांवर भरती आहे.
SSC CGL Recruitment 2024 : खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही SSC CGL भरतीसाठी अर्ज दाखल करु शकता.
- स्टेप 1: ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जावं लागेल.
- स्टेप 2: वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावरील नवीन अपडेट लिंकवर क्लिक करा.
- स्टेप 3: यानंतर SSC CGL परीक्षा 2024 Application Direct च्या पर्यायावर क्लिक करा.
- स्टेप 4: नोंदणी करा.
- स्टेप 5: यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता.
- स्टेप 6: अर्ज डाऊनलोड करा आणि प्रिंट घ्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
BOB Jobs 2024 : बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी, 600 हून अधिक पदांवर भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या