Pune Accident  : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात हिट अँड रनचे (Pune Hit And Run Case)  प्रकार वाढत असताना पोलिस मात्र झोपी गेलेत की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. सातत्याने घडणाऱ्या घटनांनंतरही त्यावर वेळीच कारवाई केली जात नाही. अत्यंत गजबजलेल्या वल्लभनगर स्थानकाजवळ हिट अँड रनचा प्रकार (Pimpari Hit And Run Case)  घडला आहे.  भरधाव वेगाने येणाऱ्या कारने  तिघांना चिरडले आहे.  एवढ्या गजबजलेल्या ठिकाणी अपघात झाला मात्र पोलीसांना काहीच कल्पना नाही.   त्यामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणावर आता नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.


 पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक भीषण अपघात झालाय. यातील कार चालक हा ससूनचा डॉक्टर असल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगता आहेत. या डॉक्टरने भरधाव वेगात तिघांना चिरडले तर एका टपरीला ही जोराची धडक दिली. एक व्यक्ती तर चाकाखाली फसली होती. या भीषण अपघाताला दीड तास उलटला तरी पोलिसांना काहीच कल्पना नाही. जखमींना जवळील रुग्णालयत दाखल करण्यात आले आहे. वाहन चालक डॉक्टरला कोणतीही जखम झालेली नाही. 


सुदैवाने कोणतीही जीवीतहानी नाही


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने आलेल्या गाडीने मागून घडक दिली. गाडीचा स्पीड एवढा जास्त होता की रिक्षाला धडकल्यानंतर गाडीने एका टपरीला धडक दिली. गाडीच्या चाकाखली एका व्यक्तीचे डोके देखील आले होते.  परंतु आसपासच्या लोकांनी लगेच गाडी हलवली त्यामुळे सुदैवाने  कोणतीही जीवीतहानी झाली नाही.   ज्या टपरीला धडक दिली त्यावेळी तिथे काही महिला काम करत होत्या. त्यांच्या अंगावर देखील तेल आणि गरम भाजी पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ससूनचे डॉक्टर चालक असल्याची माहिती समोर आली आहे . आता पोलिसांना या कार चालकाला ताब्यात घेण्याचं मोठं आव्हान समोर असणार आहे.  


पुण्यात अपघाताची मालिका सुरूच


पुण्यात अपघाताची मालिका सुरूच आहे.  पोर्शे कार अपघातानंतर पुण्यात 25 दिवसात 70  अपघात  झाले आहेत. 70  अपघातात तब्बल 31  जणांचा मृत्यू झाला आहे.  पुण्यातील विविध परिसरात अपघात झाला आहे.  54  जण गंभीर आणि किरकोळ जखमी  आहेत.   पुण्यातील वाहनांचा वेग घेतोय जीव आहे.  अपघातातील चालक मद्यपी आहेत . काही वाहन चालक पोलिसांच्या ताब्यात आहेत तर काही चालक फरार आहे. पुण्यातील वाढत्या अपघातावर  पुणे शहर पोलिस अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील म्हणाले, प्रत्येक अपघात महत्त्वाचा आहे, प्रत्येकाचा जीव वाचणे महत्त्वाचे आहे. पालकमंत्र्यांनी या संदर्भात एक बैठक घेतली आहे. सेव्ह लाईफ फाउंडेशन या संस्थेसोबत काम होईल. कल्याणीनगर अपघात झाल्यानंतर 920  ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस दाखल केल्या आहेत. पुणे शहरात अपघाताचे 22 ब्लॅक स्पॉट आहेत. 


हे ही वाचा :


Pune Accident: आमदाराच्या पुतण्यानं वेळेत मदत केली असती, तर मृत तरुण बचावला असता; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला हृदय पिळवटणारा अनुभव!