SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर एनीटाइम चॅनल, चॅनल मॅनेजर सुपरवायझर एनीटाइम चॅनल आणि सपोर्ट ऑफिसर-एनीटाइम चॅनल (SBI रिक्रूटमेंट 2022) या पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 18 मे म्हणजेच, बुधवारपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 जून 2022 आहे. तर, इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांवर अर्ज करण्यासाठी एकूण 641 पदं रिक्त आहेत.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 18 मे 2022ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जून 2022

एकूण पदांसाठीच्या रिक्त जागा

चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर एनीटाइम चॅनल (CMF-AC) : 503चॅनल व्यवस्थापक पर्यवेक्षक कधीही चॅनल (CMS-AC) : 130सपोर्ट ऑफिसर- केव्हाही चॅनेल (SO-AC) : 08

वेतन श्रेणी 

चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर एनीटाईम चॅनल (CMF-AC) : 36,000 रुपये प्रति महिनाचॅनल मॅनेजर पर्यवेक्षक एनीटाइम चॅनल (सीएमएस-एसी) : 41,000 रुपये प्रति महिनासपोर्ट ऑफिसर – एनीटाइम चॅनेल (SO-AC) : 41,000 रुपये प्रति महिना

वयोमर्यादा 

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 60 वर्ष असावं.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखत आणि गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  

महत्त्वाच्या इतर बातम्या :