SBI RBO Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) पुढील आठवड्यात SBI RBO भर्ती 2022 साठी नोंदणी प्रक्रिया बंद करणार आहे. नोंदणी प्रक्रिया 22 डिसेंबर 2022 रोजी सुरू झाली होती. ज्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023 आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप आपला अर्ज भरलेला नाही, ते SBI ची अधिकृत वेबसाईट sbi.co.in/careers द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात.


या भरती मोहिमेद्वारे स्टेट बँकेत सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यांच्या 1438 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. केवळ SBI चे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी आणि SBI (E-AB) च्या एक्स-असोसिएट्स बँक या पदांसाठी अर्ज करू शकतात.


शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. मुलाखत 100 गुणांची असेल. मुलाखतीतील पात्रता गुण बँकेद्वारे ठरवले जातील. केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवडीसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाईल, अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाकडून जारी करण्यात आलेल्या भरती अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. 


अधिकारी CPC/प्रादेशिक कार्यालय/AO (प्रशासकीय कार्यालय)/ATC (मालमत्ता ट्रॅकिंग केंद्र) किंवा संबंधित LHO द्वारे ठरवल्यानुसार, इतर कोणत्याही कार्यालयात नियुक्त केले जातील. निवृत्त अधिकारी आवश्यकतेनुसार, संकलन सहाय्यक म्हणून काम करतील. इतर कोणतीही माहिती मिळविण्यासाठी, उमेदवार अधिसूचना तपासू शकतात.


SBI मध्ये लिपिक पदांसाठीही भरती 


भारतीय स्टेट बँकेने (SBI) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लिपिक पदासाठी एकूण 5008 रिक्त जागांवर भरती करण्यात आली होती. आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रिक्त पदं आहेत. यानंतर लखनऊ आणि भोपाळमध्ये भरती केली गेली होती. महाराष्ट्र- मुंबई मेट्रो सिटी, महाराष्ट्र, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, बंगाल, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, केरळ, लखनौ येथे लिपिक पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. भारतीय स्टेट बँक लिपिक भरती परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते. सर्वप्रथम सर्व उमेदवारांना प्रिलिम्स परीक्षा म्हणजेच पूर्वपरीक्षा (SBI Prelims Exam 2022) द्यावी लागते. पूर्वपरिक्षेत निवड झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र असतात. 


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 'या' पदांवर भरती; झटपट अर्ज करा