​SBI Clerk Prelims Result 2022 Declared: एसबीआय क्लर्क प्रिलिम्स परीक्षेत बसलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून SBI क्लर्क प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल पाहण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in किंवा ibps.in वर भेट देऊ  शकतात. 


निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना त्यांचा रोल नंबर आणि विचारलेले इतर माहिती भरावी लागणार आहे. उमेदवारांनी स्टेप बाय स्टेप माहिती देऊन आपला निकाल चेक करायचा आहे. प्रिलिम्सच्या निकालासोबतच SBI ने मुख्य परीक्षेसाठी कॉल लेटर देखील जारी केले आहेत.


हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांमुळे केवळ हिमाचल वगळता स्टेट बँक ऑफ इंडियाची ही परीक्षा 12 नोव्हेंबर 2022 रोजी   घेण्यात आली होती. ज्यासाठी 30 ऑक्टोबर रोजी प्रवेशपत्र जारी करण्यात आले होते. या भरतीत SBI मध्ये एकूण 5,008 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. SBI क्लर्क प्रीलिम्स परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना आता मुख्य परीक्षेचा सामना करावा लागणार आहे.  मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.


आपला निकाल वेबसाईटवर असा पाहा


स्टेप 1: सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम SBI sbi.co.in   च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
स्टेप  2: त्यानंतर करिअर विभागात जा
स्टेप 3: नंतर करिअर टॅबवर क्लिक करा
स्टेप 4: नंतर उमेदवारांनी त्यांचे लॉगिन तपशील टाकावेत
स्टेप 5: त्यानंतर तुमचा SBI लिपिक निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल
स्टेप  6: आता उमेदवारांनी आपला निकाल पाहून घ्यावा, ही फाईल डिव्हाईसमध्ये सेव्ह करा
स्टेप 7: शेवटी निकालाची प्रिंट आउट घेण्यास विसरु नका


भारतीय स्टेट बँकेने (SBI) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लिपिक पदासाठी एकूण 5008 रिक्त जागांवर भरती करण्यात आली होती. आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रिक्त पदे आहेत. यानंतर लखनऊ आणि भोपाळमध्ये भरती केली गेली होती. महाराष्ट्र- मुंबई मेट्रो सिटी, महाराष्ट्र, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, बंगाल, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, केरळ, लखनौ येथे लिपिक पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. भारतीय स्टेट बँक लिपिक भरती परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते. सर्वप्रथम सर्व उमेदवारांना प्रिलिम्स परीक्षा म्हणजेच पूर्वपरीक्षा (SBI Prelims Exam 2022) द्यावी लागते. पूर्वपरिक्षेत निवड झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र असतात. 


 ही बातमी देखील वाचा


SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क पदांवर भरती; पाच हजारहून अधिक रिक्त जागा, झटपट अर्ज करा