Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आणि महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतील. 
 
सर्वोच्च न्यायालय


पोस्ट : ज्युनियर कोर्ट असिस्टंट (ग्रुप- बी)


शैक्षणिक पात्रता : पदवीधर, संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि., संगणक ऑपरेशनचे ज्ञान


एकूण जागा : 210


वयोमर्यादा : 18  ते 30 वर्ष


नोकरीचं ठिकाण : दिल्ली


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2022


तपशील - www.sci.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. detailed advertisement for the post of junior court assistant in the supreme court of india या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद


पोस्ट - पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, एएनएम, लॅब टेक्निशियन


शैक्षणिक पात्रता - वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, स्टाफ नर्ससाठी १२वी पास, GNM कोर्स, फार्मासिस्ट पदासाठी M.Pharm/ D.Pharm, ANM पदासाठी १०वी पास, ANM कोर्स, लॅब टेक्निशियन पदासाठी B.Sc, DMLT


एकूण जागा : 66


वयोमर्यादा : 38  वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24  जून 2022


तपशील - arogya.maharashtra.gov.in   (या वेबसाईटवर गेल्यावर नोकरीविषयक संधीवर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे


पोस्ट - संशोधन सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, सॉफ्टवेअर व्यावसायिक


शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech


एकूण जागा : 20


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जून आणि 2 जुलै 2022 (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)


तपशील - www.coep.org.in  (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक तुम्हाला दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक


पोस्ट : प्राचार्य, संचालक


एकूण जागा : 05


अर्ज पाठवण्याचा पत्ता - महात्मा गांधी विद्यामंदिर, सहावा मजला, के.बी.एच. डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल बिल्डिंग, मुंबई-आग्रा रोड, पंचवटी, नाशिक - ४२२ ००३


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2022


तपशील - www.mgv.org.in  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. advertisement  2022 वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)