Canara Bank Recruitment 2022 : तुम्हाला बँकेत (Bank Job) अधिकारी व्हायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण कॅनरा बँकेने (Canara Bank Job) अलीकडेच विविध पदांसाठी भरती काढली आहे. त्यांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मे आहे. उमेदवार अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या पात्र पदांसाठी ऑफलाइन अर्ज करून भरतीमध्ये सामील होऊ शकतात. अधिसूचनेत नोंदवलेल्या माहितीनुसार, एकूण 12 पदांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, कनिष्ठ अधिकारी अशा अनेक पदांवर ही भरती (Recruitment) निघाली आहे.
Canara Bank Recruitment 2022 : रिक्त पदांबद्दल माहिती
उपव्यवस्थापक (Back Office) : 2 पदे,
सहाय्यक व्यवस्थापक (Back Office) : 2 पदे,
सहाय्यक व्यवस्थापक (Back Office) : 1 पद,
कनिष्ठ अधिकारी (Back Office) : 2 पदे,
उपव्यवस्थापक (Back Office) : 2 पदे,
कनिष्ठ अधिकारी : 2 पदे,
सहाय्यक व्यवस्थापक : 1 पद
Canara Bank Recruitment 2022 : पात्रता आणि वयोमर्यादा
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार-
- काही पदांसाठी 50 टक्के गुणांसह ग्रॅज्युएशनची पदवी हवी
- इतर पदांसाठी संबंधित ट्रेड्समन पदवी किंवा डिप्लोमा
-उमेदवारांचे किमान वय 22 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे.
-याबद्दल अधिक माहितीसाठी, आपण अधिसूचना पाहू शकता.
Canara Bank Recruitment 2022 : अशी असेल निवड प्रक्रिया
-सर्वप्रथम उमेदवारांना अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
-त्यानंतर उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर निवडले जाईल.
-शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
-मुलाखतीत जे चांगले प्रदर्शन करतील,
-त्यांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल.
-त्यानंतरच भरती प्रक्रिया पूर्ण होईल.
Canara Bank Recruitment 2022 : अर्ज कसा करावा?
- उमेदवाराला कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाइट canarabank.com वर भेट द्यावी लागेल.
- वेबसाइटवर, त्यांना या भरतीची सूचना आणि अर्जाचा फॉर्म मिळेल.
- अर्जाची प्रिंट आउट घ्या आणि तो भरा.
- दिलेल्या पत्त्यावर सर्व कागदपत्रांसह पाठवा.
- वेबसाइटवर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
- फॉर्म पाठवण्याचा पत्ता -'जनरल मॅनेजर, एचआर डिपार्टमेंट, कॅनरा बँक सिक्युरिटीज लि., 7वा मजला, मेकर चेंबर III नरिमन पॉइंट, मुंबई - 400021'
महत्वाच्या बातम्या: