MPSC Rajyaseva Exam 2022 : महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा 2022 (Maharashtra State Servive Prelims Exams 2022) साठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ज्या उमेदवारांना यासाठी (Maharashtra State Services Recruitment 2022) अर्ज करायचा आहे, त्यांनी अधिकृत वेबसाइटवरून लवकरात लवकर अर्ज करावा. या भरती परीक्षांद्वारे (Maharashtra Rajyaseva Prelims Exam 2022) एकूण 161 पदांची (Maharashtra Government Job) भरती केली जाईल. यावर अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जून 2022 आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या या पदांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येतील. हे अर्ज प्राथमिक परीक्षेसाठी आहेत. दरम्यान, या नोकरभरतीसाठी अर्ज भरण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक आहे.
या तारखेला होणार परीक्षा
MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा (Maharashtra Rajyaseva State Services Exam 2021 Date) 2022 ही 21 ऑगस्ट 2022 रोजी घेतली जाईल. या भरती परीक्षेद्वारे महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये उमेदवारांची भरती केली जाईल.
कोण अर्ज करू शकतो?
19 ते 38 वर्षे वयोगटातील उमेदवार या परीक्षांसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित वर्गाला उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल. जोपर्यंत शैक्षणिक पात्रतेचा संबंध आहे, पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तपशील पाहण्यासाठी या नोटीसच्या लिंकवर क्लिक करा
अर्जाची फी किती?
MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 544 रुपये शुल्क भरावे लागेल. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 344 रुपये शुल्क भरावे लागेल. सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
महत्त्वाच्या इतर बातम्या
Maharashtra : महाराष्ट्रात 2 लाख 44 हजार पदं रिक्त, 'या' विभागांमध्ये होणार मोठी भरती
ICG Jobs 2022: भारतीय तटरक्षक दलात 10वी पाससाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज
- Indian Bank SO Recruitment 2022 : 'या' बँकेत 300 हून अधिक पदांची भरती; कसा कराल अर्ज, जाणून घ्या