MHADA Recruitment : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (MHADA) सरळ सेवा भरती-2021 अंतर्गत आयोजित ऑनलाईन परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीकरिता संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून पहिल्या टप्प्याअंतर्गत कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 6 व 7 जून 2022 या दोन दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे.
भरती प्रक्रियेअंतर्गत उर्वरित संवर्गातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी टप्प्याटप्प्याने बोलावण्यात येणार असून संबंधित यशस्वी उमेदवारांनी म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन म्हाडा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कागदपत्र पडताळणीच्या सूचीमध्ये नाव असलेल्या कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी कक्ष क्रमांक 215, पहिला मजला, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे पूर्व, मुंबई येथे उपस्थित राहावे, असे आवाहनही म्हाडा प्रशासनाने केले आहे.
म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी जाहीर केलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. 6 जून रोजी पहिल्या सत्रात सकाळी 10 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 1 ते 10 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. तसेच याच वेळेत उपअभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 1 ते 14 उमेदवार, तसेच सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 1 ते 24 उमेदवार, कनिष्ठ अभियंता संवर्गातील उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 1 ते 75 उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. तसेच दुसऱ्या सत्रात दुपारी 2 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 11 ते 20 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार असून याच वेळेत उपअभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 15 ते 27 उमेदवार, सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 25 ते 48, कनिष्ठ अभियंता संवर्गातील उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 76 ते 150 उमेदवार यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
7 जून रोजी सकाळी 10 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 21 ते 30 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. याच सत्रात उपअभियंता संवर्गातील उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 28 ते 41 उमेदवार, सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 49 ते 72 उमेदवार, कनिष्ठ अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 151 ते 225 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. तसेच दुसऱ्या सत्रात दुपारी 2 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 31 ते 40 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. तसेच याच वेळेत उपअभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 42 ते 54 उमेदवार, सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 73 ते 95 उमेदवार, कनिष्ठ अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 226 ते 297 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता या संवर्गातील सूचीमध्ये एकापेक्षा जास्त संवर्गाच्या सूचीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी एकाचवेळी कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत, असे आवाहन म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या