Maharashtra Police Bharti: मुंबई : महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. कारागृह विभागातील एक हजार 800 पदांसाठी तीन लाख 72 हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. 19 जूनपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.


राज्यात 17 हजार 471 जागांसाठी 17 लाखांहून अधिक अर्ज 


राज्यात 19 जून पासून पोलिस भरतीला सुरूवात होतं असून 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. बँड्समन पदासाठी 41 जागा उपलब्ध असून त्यासाठी 32 हजार 26 जणांनी अर्ज केले आहेत. तुरूंग विभागातील शिपाई या पदाच्या एका जागेमागे सुमारे 207 उमेदवार स्पर्धेत आहेत. या पदासाठी 1800 जागा उपलब्ध असून 3 लाख 72 हजार 354 अर्ज आले आहेत. चालक पदासाठी 1686 जागा उपलब्ध असून 1 लाख 98 हजार 300 अर्ज (एका जागेमागे 117) आले आहेत. सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक अर्ज पोलीस शिपाई पदासाठी आहेत. 9595 जागांसाठी 8 लाख 22 हजार 984 अर्ज आले असून एका जागेसाठी साधारण 86 उमेदवार,असं याचं गुणोत्तर आहे. 


शीघ्र कृती दलातील 4 हजार 349 जागांसाठी 3 लाख 50 हजार 592 अर्ज (एका जागेसाठी 80 उमेदवार) आले आहेत. अर्जदारांमध्ये 40 टक्के उमेदवार हे उच्चशिक्षित असून शासकिय नोकरीचे आकर्षण आणि अन्य क्षेत्रात घटलेल्या संध्यांच्या पार्श्वभूमिवर अर्ज आले असावेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण आहे. भरती प्रक्रिये दरम्यान पाऊस पडल्यास त्या विदयार्थ्यांना पुढील तारीख दिली जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. तर उमेदवारानं एका पदासाठी एकदाच फॉर्म भरणं अपेक्षित असून विविध पदांसाठी फॉर्म भरल्यास दोन्ही ठिकाणच्या मैदानी आणि परीक्षेची तारीख एक येणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. 


 वाशिम जिल्ह्यातील पोलीस दलात 68 रिक्त जागेसाठी एकूण 4 हजार 175 अर्ज


राज्यात रिक्त झालेल्या पोलीस  17,471 रिक्त पदासाठी .  पोलिस भरती होत आहे.  वाशिम जिल्ह्यातील पोलीस दलात 68 रिक्त जागेसाठी एकूण 4175 आवेदन अर्ज प्राप्त झाले असून पोलीस मुख्यालय येथील प्रांगणामध्ये पोलीस शिपाई पदाकरीता पोलीस भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी 50 अधिकारी आणि 250 कर्मचारी या ठिकाणी उपस्थितीत राहणार आहेत. दिनांक 15 जून रोजी मैदानी चाचणी करीता एकुण 1 हजार उमेदवार असणार आहेत. पावसामुळे मैदानी चाचणी होऊ शकली नाही. तर भरती उमेदवार यांना पुढील सुयोग्य तारीख देण्यात येईल तसेच भरती मधील उमेदवार हे वेगवेगळ्या पदाकरीता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख देण्यात येईल. तसेच, कोणता गैरप्रकार होणार नाही अशी माहिती वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 


कोल्हापुरात शिपाई पदाच्या 154 आणि पोलीस चालक पदाच्या 59 जागांसाठी भरती 


कोल्हापूर पोलीस दलातील शिपाई पदाच्या 154 आणि पोलीस चालक पदाच्या 59 जागांसाठी 19 ते 27 जून दरम्यान भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पोलीस मुख्यालया जवळील पोलीस परेड ग्राउंडवर ही भारतीय प्रक्रिया होणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. शिपाई पदाच्या 154 जागांसाठी 6 हजार 677 तर शिपाई पदाच्या 59 जागांसाठी 4668 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यावेळी पहिल्यांदाच उमेदवारांच्या शारीरिक चाचणी आरएफआयडी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. शिवाय एकाच वेळी दोन ठिकाणी अर्ज उमेदवारांना देखील प्रमाणपत्र देऊन चार दिवसांची मुदत दिली जाणार असल्याचं महिंद्र पंडित यांनी म्हटलंय. पोलीस भरती दरम्यान उमेदवारांच्या शारीरिक चाचणी वेळी पावसाचा अडथळा आल्यास ही शारीरिक चाचणी कसबा बावडा ते शिये या मार्गावर घेण्याची पर्यायी व्यवस्था देखील करण्यात ची माहितीसुद्धा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे.


धाराशीवमध्ये चालक पदांसाठी 4503 तर पोलीस शिपाई पदासाठी 3497 अर्ज


19 तारखेपासून सुरु असलेल्या पोलीस भरतीसाठी धाराशिव पोलीस विभागाकडून  जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलीय.धाराशिव जिल्ह्यामध्ये  पोलीस शिपायाच्या 99 जागा तर चालक पदाच्या 44 जागासाठी भरती होतेय. चालक पदासाठी 4503 अर्ज दाखल झाले असून 3497 अर्ज पोलीस शिपाई या पदासाठी दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलीय.या भरतीमध्ये तोंडी परीक्षा ग्राउंड हे अत्यंत पारदर्शकपणे होणार असून जास्तीत जास्त उमेदवारांनी भरतीसाठी उपस्थित राहावे असे आव्हान देखील पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलं आहे.


रायगडमध्ये 422 रिक्तपादासांठी 21 जून पासून पोलीस भरती


रायगड जिल्ह्यात 422 पोलीस पदांसाठी 31 हजार 63 अर्ज दाखल झाले आहेत. ही भरती 21 जूनपासून नेहूली येथील क्रिडा संकुलात पार पडणार आहे. तब्बल 30 दिवस ही भरती प्रक्रिया सुरु राहणार आहे. अत्यंत पारदर्शक पध्दतीने ही भरती होणार असून कुठल्याही प्रकारे  होणार नाही याची खबरदारी घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज पत्रकार परीषदेत दिली. पोलीस शिपाईपदासाठी (बॅन्ड्समन समाविष्ठ 9 पदं) 391 व चालक पोलीस शिपाई 31 पदांसाठी ही भरती होणार आहे. पोलीस शिपाई पदाकरीता 23 हजार 793 पुरुष, तर 4 हजार 860 महिला असे एकूण 28 हजार 833 अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर चालक शिपाई पदाच्या 31 रीक्त जागांसाठी 2 हजार 230 अर्ज प्राप्त झाले असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे  अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी यावेळी सांगितलं.