LIC Housing Finance Limited Jobs 2022 : तुम्ही पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच. LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेडनं (LIC Housing Finance Limited) पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी अनेक पदांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत साइट lichousing.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती 25 ऑगस्ट 2022 रोजी संपेल.


रिक्त जागांचा तपशील 


या भरती मोहिमेद्वारे सहाय्यक व्यवस्थापकाच्या 30 आणि सहाय्यकांच्या 50 पदांसाठी भरती केली जाणार आहे.


शैक्षणिक पात्रता


या भरती मोहिमेसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत साईटचीही मदत घेऊ शकतात.


वयोमर्यादा 


या भरती मोहिमेअंतर्गत असिस्टंट मॅनेजरच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 40 वर्षां दरम्यान असावं. तर सहाय्यक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 21 ते 28 वर्ष असावं.


कशी होईल निवड?


ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. ऑनलाइन परीक्षेची वेळ 120 मिनिटांची असेल. ज्यामध्ये 200 प्रश्न विचारले जातील.


वेतन 


सहाय्यक पदांसाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 33 हजार 960 रुपये वेतन दिलं जाईल. तर सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सुमारे 80 हजार रुपये वेतन दिलं जाणार आहे.


महत्त्वाच्या तारखा 


नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 04 ऑगस्ट 2022
नोंदणी करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2022
प्रवेशपत्र जारी करणे : परीक्षेच्या 7 ते 14 दिवस आधी
परीक्षेची तारीख : सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2022 (संभाव्य)



अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :