Railway Job: सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. उत्तर मध्य रेल्वेत सध्या १६७९ जागांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. १५ ते २४ वर्ष वयोगटातील तरुणांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. देशभरातून या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत असून १० वी पास असणाऱ्या कोणत्याही उमेदवार १५ ऑक्टोबरपर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात.  एकूण २२ पदांसाठी या जागा असून या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे.


कोणत्या पदांसाठी सुरु आहे भरती?


मेकॅनिक, फिटर,सुतार, इलेक्ट्रीशियन, वायरमन, लोहार, अप्रेंटिस पदामध्ये फिटर, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, वेल्डर, मेकॅनिक डिझेल, कॉम्प्युटर ऑपरेटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल अशा एकूण २२ पदांसाठी ही भरती सुरु असून या पदांसाठी १६ सप्टेंबरपासून अर्ज सुरु झाले आहेत. नॉर्थ सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारास अर्ज दाखल करण्यात येईल.


पात्रता काय?



  • उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदामध्ये फिटर, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, वेल्डर, मेकॅनिक डिझेल, कॉम्प्युटर ऑपरेटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 

  • या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवाराला मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी ५० टक्के गुणांनी पास असणे आवश्यक आहे. तसेच संबंधीत ट्रेडमध्ये आयटीआय ची पदवी प्राप्त करणे गरजेचे आहे.

  • उमेदवाराचे वय १५ ते २४ वयोगटातील असणे आवश्यक आहे. SC,ST, OBC साठी पाच वर्षांसाठी वयात सूट असेल.

  • नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी १०० रुपये अर्जशुल्क आकारले जाईल. 


पगार किती असेल?


उत्तर मध्य रेल्वेतून होणारी ही थेट भरती आहे. ही पदे खुल्या बाजारपेठेतील असल्यानं १८००० ते ५६९०० रुपये पगार असेल असे या भरतीच्या जाहीरातीत सांगण्यात आले आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर जाऊन ही माहिती वाचावी.


कोकण रेल्वेतही नोकरीची संधी


कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) अंतर्गत विविध पदांची भरती सुरु झाली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महिना 50000 रुपयापर्यंत पगार मिळणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती. 


हेही वाचा:


Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा