Job Majha : IRCTC, अहमदनगर महानगरपालिका आणि खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे विविध पदांची भरती निघाली आहे. दहावी पास उमेद्वारांना देखील या भरतीमध्ये संधी आहे. IRCTC मधील संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंग असिस्टंट या पदासाठी दहावी उत्तीर्ण आणि आयटीआयचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.  अहमदनगर महानगरपालिकेतील पदांसाठी थेट मुलाखत होणार आहे. 


IRCTC


पोस्ट : संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंग असिस्टंट


शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, ITI (COPA)


एकूण जागा : 80


वयोमर्यादा : 25 वर्षांपर्यंत


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख :  25 ऑक्टोबर 2022


अधिकृत वेबसाईट :  www.irctc.co.in 


अहमदनगर महानगरपालिका


पोस्ट : कनिष्ठ अभियंता, विद्युत पर्यवेक्षक


शैक्षणिक पात्रता : कनिष्ठ अभियंता पदासाठी अभियांत्रिकी पदवी, विद्युत पर्यवेक्षक पदासाठी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी


एकूण जागा : 17


एकूण जागा : अहमदनगर


थेट मुलाखत होणार आहे.


मुलाखतीचा पत्ता : आयुक्त कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद रोड


मुलाखतीची तारीख : 17 ऑक्टोबर 2022


तपशील : amc.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या jobs वर क्लिक करा. अहमदनगर मनपा मध्‍ये पाणी पुरवठा, बांधकाम विभाग, नगररचना विभाग, विदुत विभागासाठी करारबध्‍द पध्‍दतीने मासिक मानधनावर अटी आणि शर्ती प्रमाणे थेट मुलाखतीद्वारे नेमणुकी बाबत.. या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई


एकूण 9 जागांसाठी भरती होत आहे.


पोस्ट : उपमुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक


शैक्षणिक पात्रता :  बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग / बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी, सनदी लेखापाल, मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी, 15 वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 09 (यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी २ जागा, संचालक पदासाठी सात जागा आहेत.)


नोकरीचं ठिकाण : मुंबई


अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक (प्रशासन आणि मानव संसाधन) खादी आणि ग्रामोद्योग आयोग, ग्रामोदय, ३, इर्ला रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई - 400056 


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 9 नोव्हेंबर 2022 


तपशील :  www.kvic.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर vacancies वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)