मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न 'जॉब माझा' (Job Majha ) या माध्यमातून सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. मुलाखतीद्वारे विविध पदांसाठी तुम्हाला या संस्थेमध्ये अर्ज करता येईल. यामुळे तरुणांना सरकारी खात्यात नोकरी करुन भविष्य घडवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी कुठे अर्ज करावा यासंबंधीची माहिती सविस्तर जाणून घेऊया.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ
वित्त अधिकारी
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम
एकूण जागा - 01
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक - 26 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.mahait.org
------
लेखापरीक्षण अधिकारी
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम
एकूण जागा - 01
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक - 26 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.mahait.org
---
वरिष्ठ खाते कार्यकारी
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम
एकूण जागा - 02
मुलाखत दिनांक - 26 सप्टेंबर 2023
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
अधिकृत संकेतस्थळ : www.mahait.org
-------
मुलाखतीचे ठिकाण : Maharashtra Information Technology Corporation Limited, 3rd Floor, Apeejay House, Near K.C College, Churchgate, Mumbai 400020.