Job Majha :  अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लि. म्हणजेच बेसिलमध्ये भरती सुरू असून त्यासाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,


BECIL (ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लि.)


एकूण 123 जागांसाठी भरती होत आहे.


सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी आपण विस्ताराने माहिती जाणून घेऊयात.


पोस्ट - टेक्निशियन (लॅबोरेटरी)


शैक्षणिक पात्रता - मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये पदवी, 2 वर्षांचा अनुभव


एकूण जागा - 23


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जून 2022


तपशील - www.becil.com



पोस्ट - निम्न श्रेणी लिपिक (LDC)


शैक्षणिक पात्रता - 12वी उत्तीर्ण, टायपिंग इंग्रजी 35 आणि हिंदी 30 श.प्र.मि.


एकूण जागा - 18


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जून 2022


तपशील - www.becil.com



पोस्ट - टेक्निशियन (OT)


शैक्षणिक पात्रता - B.Sc (OT) टेक्नॉलॉजी


एकूण जागा - 12


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जून 2022


तपशील - www.becil.com



पोस्ट - स्टोअर कीपर


शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी, 3 वर्षांचा अनुभव


एकूण जागा - 8


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जून 2022


तपशील - www.becil.com



पोस्ट - टेक्निशियन (रेडिओलॉजी)


शैक्षणिक पात्रता - रेडिओलॉजीमध्ये B.Sc.


एकूण जागा - 6


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जून 2022


तपशील - www.becil.com



पोस्ट - स्टेनोग्राफर


शैक्षणिक पात्रता - 12वी पास, 5 वर्षांचा अनुभव


एकूण जागा - 5


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जून 2022


तपशील - www.becil.com



पोस्ट - डेंटल टेक्निशियन (मेकॅनिक)


शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात डिप्लोमा, 1 वर्षाचा अनुभव


एकूण जागा - 4


या सोबतच लाइब्रेरियन ग्रेड-III, ज्युनियर वॉर्डन, ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), ज्युनियर इंजिनिअर (AC & R), ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर, योगा इंस्ट्रक्टर, MSSO ग्रेड-II, फार्मासिस्ट, प्रोग्रामर, ज्युनियर फिजिओथेरेपिस्ट, असिस्टंट डायटीशियन, MRT, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरेपिस्ट, मोर्चरी अटेंडंट., स्टॅटिस्टिकल असिस्टंट, ऑप्टोमेट्रिस्ट, टेक्निशियन (रेडिओथेरेपी), परफ्युजनिस्ट, टेक्निशियन (रेडिओलॉजी), टेक्निशियन (लॅबोरेटरी) अशा विविध पदांसाठी भरती होत आहे. विस्ताराने माहिती तु्म्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जून 2022


तपशील - www.becil.com (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. vacancies वर क्लिक करा. advertisement number - 150 वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल).