Job Majha :  भारतीय पोस्ट खात्यात विविध पदांच्या 2 हजार 508 जागांसाठी भरती निघाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये देखील विविध पदांच्या 250 जागांसाठी भरती निघाली आहे. याशिवाय कृषी विज्ञान केंद्र  अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. 

भारतीय पोस्ट ( india post )

पोस्ट : शाखा पोस्टमास्टर, सहायक शाखा पोस्टमास्टर, ग्रामीण डाक सेवक

शैक्षणिक पात्रता :  10 वी उत्तीर्ण, संगणकाचं ज्ञान, सायकल चालवता आली पाहिजे.

एकूण जागा : 2 हजार 508

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : indiapostgdsonline.gov.in 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ( Central Bank of India  )

पोस्ट : चीफ मॅनेजर (स्केल IV)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, 7 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 50

वयोमर्यादा : 35 ते 40 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट  : www.centralbankofindia.co.in 

पोस्ट : सिनियर मॅनेजर (स्केल III)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, 5 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 200

वयोमर्यादा : 35 ते 40 वर्ष

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.centralbankofindia.co.in 

कृषी विज्ञान केंद्र, अहमदनगर (Agricultural Science Centre, Ahmednagar )

पोस्ट : शास्त्रज्ञ आणि प्रमुख, विषय विशेषज्ज्ञ.. यात कृषी विस्तार, उत्पादन आणि गृहशास्त्र असे 3 विभाग आहेत. तसंच ट्रॅक्टर चालक हवेत.

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी, अनुभव आणि ट्रॅक्टर चालकसाठी १०वी पास, वाहन चालवण्याचा परवाना आणि ITI आयटीआय असल्यास प्राधान्य दिलं जाईल.

एकूण जागा : 05 (यात प्रत्येक विभागासाठी 1 जागा आहे.)

वयोमर्यादा 27 ते 47 वर्ष

नोकरीचं ठिकाण : अहमदनगर

या जागांसाठी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 5 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.kvk.pravara.com 

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. 

महत्वाच्या बातम्या

Job Majha : यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर, महावितरण कोल्हापूर आणि जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे विविध पदांसाठी भरती