Salman Khan Helped Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) 'भाईजान' असं म्हटलं जातं. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मंडळीच्या अडीअडचणीला सलमान खान धावून जात असतो. 'ड्रामाक्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) सलमानला भाऊ मानते. त्यामुळे लाडकी बहिण जेव्हा अडचणीत येते तेव्हा भाईजान तिच्या मदतीला धावून जातो. जाणून घ्या आतापर्यंत सलमान खान राखीच्या मदतीला कधी धावून आला आहे...


सलमानमुळे राखीच्या आईवर उपचार झाले


'बिग बॉस'च्या चौदाव्या (Bigg Boss 14) पर्वात राखी सावंत स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळी तिच्या आईची प्रकृती खालावली. 'बिग बॉस'च्या घरातून राखीला कळलं की तिच्या आईला कॅन्सर झाला आहे. त्यावेळी आईवर उपचार करण्यासाठी सलमानने तिला मदत केली होती. अनेक मुलाखतींत अभिनेत्रीने स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे. 






सलमानने घेतलेली राखीच्या पूर्वाश्रमीच्या पतीची शाळा


राखी सावंतने रितेशसोबत गुपचूप लग्न केलं होतं. या लग्नामुळे ती चर्चेत आली होती. रितेशसोबत ती 'बिग बॉस'च्या पंधराव्या (Bigg Boss 15) पर्वातदेखील दिसली होती. पण रितेशने राखीसोबत गैरवर्तन केलं होतं. त्यामुळे सलमानने रितेशची चांगलीच शाळा घेतली होती. 


'बिग बॉस मराठी'त एन्ट्री!


राखी सावंतला 'बिग बॉसची बायको' असं म्हटलं जातं. 'बिग बॉस'च्या अनेक पर्वात राखीची झलक दिसली आहे. हिंदी बिग बॉसनंतर राखीने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातदेखील आपल्या खेळीने सर्वांना थक्क केलं आहे. पण सलमान खानमुळेच राखी सावंतला बिग बॉसच्या घरात एन्ट्री मिळाली होती. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखीने सलमानचे आभार मानले आहेत. 


सलमानने वाचवलं राखीचं लग्न


राखी सावंत गेल्या काही दिवसांपूर्वी आदिल खानसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर एका मुलाखतीत राखीने खुलासा केला होता की, सलमानने तिचं हे लग्न वाचवलं आहे.  


राखी सावंतच्या आईचं निधन


राखी सावंतच्या आईचे (Rakhi Sawant Mother)  निधन झाले आहे. जुहूच्या क्रिटि केअर हॉस्पिटलमध्ये राखी सावंतच्या आईने अखेरचा श्वास घेतला आहे.  राखी सावंतची आई जया भेडा या गेल्या तीन वर्षांपासून कॅन्सर आजाराशी लढा देत होत्या. मात्र अखेर त्यांचा हा लढा अपयशी ठरला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला राखीच्या आईला ब्रेन ट्यूमर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.


संबंधित बातम्या


Rakhi Sawant Mother Death: राखी सावंतच्या आईचं निधन, जुहूच्या क्रिटि केअर हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास