Job majha : दहावी पास आणि आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी आहे. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 


 वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, नागपूर


पोस्ट : ट्रेड अप्रेंटिस (यात ITI ट्रेड अप्रेंटिस आणि फ्रेशर्स ट्रेड अप्रेंटिस हवेत)


शैक्षणिक पात्रता : यात ITI ट्रेड अप्रेंटिससाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI आणि फ्रेशर्स ट्रेड अप्रेंटिससाठी 10 वी उत्तीर्ण ही पात्रता हवी.)


एकूण जागा : 900


वयोमर्यादा :  18 ते 25 वर्ष


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर 2022


तपशील : www.westerncoal.in  (या वेबसाईटवर गेल्यावर career मध्ये अप्रेंटिसमध्ये ट्रेड अप्रेंटिसवर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL)


पोस्ट : मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) (यात मेकॅनिकल मॅनेजमेंट ट्रेनीसाठी 65 जागा, मेटलर्जीकलसाठी 52, इलेक्ट्रिकलसाठी 59, इन्स्ट्रुमेंटेशन मॅनेजमेंट ट्रेनीसाठी 13, माइनिंगसाठी 26 जागा, केमिकलसाठी 14 आणि सिव्हिल मॅनेजमेंट ट्रेनीसाठी 16 जागा आहेत.)


शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी, GATE 2022


एकूण जागा : 245


वयोमर्यादा : 28 वर्षांपर्यंत


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 नोव्हेंबर 2022


तपशील : www.sail.co.in  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. news मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातली जाहिरात स्क्रोल होताना दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे


पोस्ट : अतिविशेषज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक, तालुका समूह संघटक, लॅब टेक्निशियन आणि इतर पदंही आहेत.


शैक्षणिक पात्रता : DM/ MD/ MS/ DCH/ DNB/ MBBS/ BAMS/ MSW/ पदवीधर/ B.Com/ DMLT/ १२वी उत्तीर्ण (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)


एकूण जागा : 195


नोकरीचं ठिकाण : पुणे


ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण, सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पुणे


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2022


तपशील : zppune . org   (या वेबसाईटवर गेल्यावर प्रसार प्रसिद्धीमध्ये भरती प्रक्रियेवर क्लिक करा. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पद भरती जाहिरात ऑक्टोबर 2022 या लिंकवरची जाहिरात डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)