Job Majha : एसटी महामंडळ चंद्रपूर , वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था पुणे , इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाईड न्यूट्रिशन मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे.  


एसटी महामंडळ, चंद्रपूर


पोस्ट : शिकाऊ उमेदवार (यात ऑटो इलेक्ट्रिशियन, वेल्डर, पेंटर, मेकॅनिक यांचा समावेश आहे.)


शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, संबंधित विषयात ITI


एकूण जागा : 83


नोकरीचं ठिकाण : चंद्रपूर


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2022


अधिकृत वेबसाईट : msrtc.maharashtra.gov.in  


वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था, पुणे


पोस्ट : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि संशोधन अधिकारी


शैक्षणिक पात्रता : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदासाठी पदव्युत्तर पदवी आणि संशोधन अधिकारी पदासाठी पदवीधर


एकूण जागा : 06


वयोमर्यादा : प्राध्यापक पदासाठी 56 वर्षांपर्यंत, सहयोगी प्राध्यापक पदासाठी 50 वर्षांपर्यंत, संशोधन अधिकारी पदासाठी 30 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीक : 30 नोव्हेंबर 2022


तपशील : vamnicom.gov.in 


इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाईड न्यूट्रिशन, मुंबई


पोस्ट : सहाय्यक व्याख्याता सह सहाय्यक प्रशिक्षक, निम्न विभाग लिपिक, शिक्षक सहयोगी


शैक्षणिक पात्रता : पदव्युत्त पदवी, MBA, 12वी पास, टायपिंगचा वेग 40 श.प्र.मि. (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)


एकूण जागा :  21


नोकरीचं ठिकाण : मुंबई


ऑफलाईन पद्धतीने तु्म्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रिन्सिपल, हॉटेल मॅनेजमेंट संस्था, केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाईड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई- 400028 


अर्ज करण्याची शेवटची तारीख :  28 नोव्हेंबर 2022


तपशील :  www.ihmctan.edu  (या वेबसाईटवर गेल्यावर संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. हिंदी, इंग्रजी दोन्ही भाषेत जाहिरात आहे. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, टाटा मेमोरियल सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?