Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. SBI,सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, कृषी विभाग येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर


SBI


पोस्ट - कनिष्ठ सहयोगी (लिपिक)



  • शैक्षणिक पात्रता - पदवीधर

  • एकूण जागा - 5  हजार 

  • वयोमर्यादा - 20 ते 28 वर्ष

  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 सप्टेंबर 2022

  • तपशील - www.sbi.co.in  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Join SBI मध्ये current openings वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक


पोस्ट - सहाय्यक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी



  • शैक्षणिक पात्रता - सहाय्यक महाव्यवस्थापक पदासाठी कायदा पदवीधर. CA, M.Com/ MBA, शाखा व्यवस्थापक पदासाठी बी.कॉम/ एम. कॉम, विपणन कार्यकारी पदासाठी एमबीए, मार्केटिंग ही पात्रता हवी.

  • एकूण जागा - 18

  • नोकरीचं ठिकाण - सांगली

  • वयोमर्यादा- 35 ते 50 वर्ष

  • अर्ज पाठवण्याचा पत्ता- मुख्य कार्यकारी अधिकारी, 404, सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, खानभाग, सांगली – 416416

  • अर्ज पाठण्याचा ईमेल आयडी - subhrd@sangliurbanbank.com 

  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 17 सप्टेंबर 2022

  • तपशील- www.sangliurbanbank.in 


कृषी विभाग, गोवा


पोस्ट - किसान मित्र



  • शैक्षणिक पात्रता - बारावी उत्तीर्ण, कोकणी भाषेचं ज्ञान, कृषी फलोत्पादन/ विज्ञानमध्ये पदवी किंवा पॉलिटेकिकमधून डिप्लोमा

  • एकूण जागा - 07

  • नोकरी ठिकाण - गोवा

  • वयोमर्यादा - 18 ते 45 वर्ष

  • थेट मुलाखत होणार आहे.

  • मुलाखतीचं ठिकाण- कृषी संचलनालय, कृषी भवन, टोंक, करंझाळे-गोवा

  • मुलाखतीची तारीख - 16 सप्टेंबर 2022

  • तपशील - www.agri.goa.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये vacancies वर क्लिक करा. Advertisement for the post of Kissan Mitra या लिंकमधली जाहिरात download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी


पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक



  • शैक्षणिक पात्रता - फार्मसी काऊंसिल ऑफ इंडियानुसार पात्रता

  • एकूण जागा - 06

  • नोकरीचं ठिकाण - चंद्रपूर

  • अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - svcpwarora@gmail.com 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 सप्टेंबर 2022

  • तपशील - www.siddhivinayakpharmacycollege.org