Job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा, आयकर विभाग आणि महावितरण नागपूर येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवरांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. बँक ऑफ बडोदामधील भरती ही संपूर्ण देशभर होत आहे. यात संपादन अधिकारी पदासाठी 500 जागा भरण्यात येणार असून यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि बँकिंग क्षेत्रातील एक वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
बँक ऑफ बडोदा ( Bank of Baroda )
पोस्ट : संपादन अधिकारी (acquisition officers)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, एक वर्षाचा अनुभव
एकूण जागा : 500
वयोमर्यादा : 21 ते 28 वर्ष
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट : www.bankofbaroda.in
आयकर विभाग ( Income Tax Department )
विविध पदांच्या 71 जागांसाठी भरती निघाली आहे.
पो्सट : आयकर निरीक्षक
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
एकूण जागा : 10
वयोमर्यादा : 30 वर्ष
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 24 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट : incometaxbengaluru.org
पोस्ट : कर सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
एकूण जागा : 32
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 24 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट : incometaxbengaluru.org
पोस्ट : मल्टी-टास्किंग स्टाफ
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
एकूण जागा : 29
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 24 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट : incometaxbengaluru.org
महावितरण, नागपूर ( Mahavitaran Nagpur)
पोस्ट : पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : पदवीधर अप्रेंटिससाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी, डिप्लोमा अप्रेंटिससाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा : 60
नोकरीचं ठिकाण : नागपूर
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.
महत्वाच्या इतर बातम्या :
Job Majha : आयडीबीआय बँक आणि सार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध पदांसाठी भरती