Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.


पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,


पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया


विविध पदांच्या 800 जागांसाठी भरती निघाली आहे.


पोस्ट  - फिल्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)


शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टिम इंजिनिअरिंग/ पॉवर इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल) विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.), 1 वर्षाचा अनुभव


एकूण जागा – 50


वयोमर्यादा – 29 वर्षांपर्यंत


अर्ज कऱण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2022


अधिकृत वेबसाईट -  www.powergrid.in


 
पोस्ट - फिल्ड इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन)


शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.), 1 वर्षाचा अनुभव


एकूण जागा – 15


वयोमर्यादा – 29 वर्षांपर्यंत


अर्ज कऱण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2022


अधिकृत वेबसाईट -  www.powergrid.in


 
पोस्ट - फिल्ड इंजिनिअर (IT)


शैक्षणिक पात्रता - कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअर/IT विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.), 1 वर्षाचा अनुभव


एकूण जागा – 15


वयोमर्यादा – 29 वर्षांपर्यंत


अर्ज कऱण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2022


अधिकृत वेबसाईट -  www.powergrid.in


 
पोस्ट – फिल्ड सुपरवायजर (इलेक्ट्रिकल)


शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टिम इंजिनिअरिंग/ पॉवर इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल) विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा, १ वर्षाचा अनुभव


एकूण जागा – 480


वयोमर्यादा – 29 वर्षांपर्यंत


अर्ज कऱण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2022


अधिकृत वेबसाईट -  www.powergrid.in


 
पोस्ट - फिल्ड सुपरवायझर (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन)


शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा, १ वर्षाचा अनुभव


एकूण जागा – 240


वयोमर्यादा – 29 वर्षांपर्यंत


संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.


ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.


अर्ज कऱण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2022


अधिकृत वेबसाईट -  www.powergrid.in



सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका


पोस्ट - विशेषज्ज्ञ भूलतज्ज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स


शैक्षणिक पात्रता – विशेषतज्ज्ञ भूलतज्ज्ञसाठी एमडी भूलतज्ज्ञ / डीए / डीएनबी, पूर्णवेळ आणि अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी  MBBS MCI/MNC काऊन्सिलकडील नोंदणी अनिवार्य, स्टाफ नर्ससाठी GNM/ B.Sc नर्सिंग आणि MNC नोंदणी अनिवार्य आहे.


एकूण जागा – 15 (यात विशेषज्ज्ञ भूलतज्ज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी प्रत्येकी १ जागा, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी 3 जागा, स्टाफ नर्ससाठी 10 जागा आहेत.)


नोकरीचं ठिकाण – सांगली


ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.


अर्ज पाठवण्याचा पत्ता - पसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस. पी. ऑफिस जवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर – 416009


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2022


अधिकृत वेबसाईट - www.smkc.gov.in