Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे आणि शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला या ठिकाणी भरती सुरू आहे. त्यासाठी अर्ज कसा करायचा, त्याची पात्रता काय याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
पोस्ट – सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता - B.Tech/B.E, Diploma, Any Masters Degree, CA, ICWA, M.A, M.Ed, M.Sc, M.E/M.Tech, MBA/PGDM, MCA, MS, M.Phil/Ph.D.
एकूण जागा – 105
नोकरीचं ठिकाण – जळगाव, नंदुरबार
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय कराय़चं आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – द रजिस्ट्रार, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव – 425001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जून 2022
तपशील - www.nmu.ac.in
शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज, सांगोला
पोस्ट - एचओडी, लेक्चरर, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी, कार्यशाळा अधीक्षक, टर्नर, फिटर, वेल्डर, सुतार, सीएनसी ऑपरेटर, शीट मेटल वर्कर, लॅब असिस्टंट, ग्रंथपाल, स्टोअर कीपर, अकाउंटंट, लिपिक, शिपाई, ड्रायव्हर, गार्डनर, वसतिगृह रेक्टर
शैक्षणिक पात्रता - राज्य सरकारच्या MSBTE नियमानुसार
एकूण जागा - 73
नोकरीचं ठिकाण - सोलापुरातलं सांगोला
अर्ज पाठवण्याचा पत्ता - शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जून 2022
तपशील - www.spcsangola.com
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता - M.Phil/ Ph.D.
एकूण जागा - 12
नोकरीचं ठिकाण - नागपूर
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्राचार्य/डीन/संचालक, अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय, काटोल रोड, छावनी ता. नागपूर शहर, जिल्हा- नागपूर- 440013
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 जून 2022
तपशील - www.nagpuruniversity.org
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे
पोस्ट - हिंदी अधिकारी, स्टेनोग्राफर ग्रेड III
शैक्षणिक पात्रता - हिंदी अधिकारी पदासाठी पदव्युत्तर पदवी, स्टेनोग्राफर पदासाठी पदवीधर, इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि., इंग्रजी शॉर्टहँड 100 श.प्र.मि.
एकूण जागा - 3
नोकरीचं ठिकाण - पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जुलै 2022
तपशील - www.tropmet.res.in