Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
जलशक्ती, नागपूरपोस्ट - कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी)शैक्षणिक पात्रता - मॅट्रिक पास, जड वाहन चालवण्याचा परवाना, 3 वर्षांचा अनुभवएकूण जागा - 26वयोमर्यादा - 18 ते 27 वर्षऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.अर्ज पाठवण्याचा पत्ता - ऑफीस ऑफ द रिजनल डायरेक्टर, CGWB, सेंट्रल रिजन, एन.एस. बिल्डिंग, VCA च्या विरुद्ध दिशेला, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 21 ऑगस्ट 2022तपशील - www.jalshakti-dowr.gov.in
व्हिजन कॉलेज ऑफ नर्सिंग, बुलडाणापोस्ट - प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उप-प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/वाचक, सहायक प्राध्यापक/व्याख्याता, शिक्षक/क्लिनिकल प्रशिक्षकशैक्षणिक पात्रता - नर्सिंगमध्ये मास्टर्स डिग्री, M.Sc.(N)/ P.B.B.Sc.(N)/ B.Sc.(N)एकूण जागा - 17ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 ऑगस्ट 2022अर्ज पाठवण्याचा पत्ता - अध्यक्ष, व्हिजन बुलडाणा एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी, व्हिजन कॉलेज ऑफ नर्सिंग, मु. पोस्ट- येळगाव, जि. बुलडाणा- 443001तपशील - www.muhs.ac.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये recruitment @ affiliated colleges यावर क्लिक करा. 22 जुलैच्या जाहिरातीवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स लि. मुंबईपोस्ट - अधिकारी (विपणन)शैक्षणिक पात्रता - नियमित आणि पूर्णवेळ UGC/AICTE मान्यताप्राप्त विज्ञान / अभियांत्रिकी / कृषी पदवीधर किंवा पूर्णवेळ UGC/AICTE मान्यताप्राप्त पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी (एमबीए / एमएमएस), अनुभव महत्वाचा आहे.एकूण जागा - 18वयोमर्यादा - 34 वर्षांपर्यंतऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑगस्ट 2022तपशील - www.rcfltd.com (या वेबसाईटवर गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या whats new मध्ये Advertisement for the Post of Officer (Marketing) – E1 Grade या लिंकवर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि., नाशिकपोस्ट - ITI ट्रेड अप्रेंटिसशैक्षणिक पात्रता - संबंधित ट्रेडमध्ये ITIएकूण जागा - 455 (यात फिटरसाठी 186 जागा, टर्नरसाठी 28 जागा, मशिनिस्टसाठी 26 जागा, कारपेंटरसाठी 4 जागा, मशिनिस्ट (ग्राईंडर)साठी 10 जागा, इलेक्ट्रिशियनसाठी 66 जागा, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)साठी 6 जागा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी 8 जागा, पेंटरसाठी 7 जागा, शीट मेटल वर्करसाठी 4 जागा, मेकॅनिक (मोटर व्हेईकल)साठी 4 जागा, COPA साठी 88 जागा, वेल्डर (G & E)साठी 8 जागा, स्टेनोग्राफर (इंग्रजी)साठी 6 जागा आहेत.नोकरीचं ठिकाण - नाशिकअर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2022तपशील - www.hal-india.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Engagement of apprentice trainees at HAL-Nasik 2022-23 (ITI-Trades) या लिंकवर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)