Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात  (Job) आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. टाटा मेमोरियल सेंटर, येथे विविध पदांच्या 164 जागांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा? याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

टाटा मेमोरियल सेंटर येथे विविध 164 जागांसाठी भरती निघाली आहे. जाणून घ्या सविस्तर

पोस्ट - मल्टी-टास्किंग स्टाफ, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक समन्वयक (डेटा), तांत्रिक समन्वयक (वैद्यकीय), डेटा एंट्री ऑपरेटर, क्षेत्र अन्वेषक, संशोधन सहाय्यक, परिचारिका, रुग्ण सहाय्यक, फार्मासिस्ट

शैक्षणिक पात्रता - 10 वी, 12 वी, B.Sc नर्सिंग, BAMS, BDS, BHMS, डिप्लोमा, GNM, MCA, MDS प्रमाणपत्र/पदवी असणे आवश्यक आहे. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.

एकूण जागा - 164

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 डिसेंबर 2022

तपशील - tmc.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. advertisement number - HBCH & RC/ PROJECT/ 2022/ P011 यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे (NCCS)

विविध पदांच्या 8 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - संशोधन सहयोगी – I, कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहयोगी – II, प्रकल्प सहयोगी – I

शैक्षणिक पात्रता - पीएच.डी / एमडी / एमएस / एमडीएस, पदव्युत्तर पदवी

एकूण जागा - 8 (यात संशोधन सहयोगी – I साठी 1 जागा, कनिष्ठ संशोधन फेलो पदासाठी २ जागा, प्रकल्प सहयोगी – II पदासाठी 2 जागा, प्रकल्प सहयोगी – I साठी 3 जागा आहेत.)

नोकरीचं ठिकाण - पुणे

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट -www.nccs.res.in

इतर महत्वाच्या बातम्या

Job Majha: राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि 'या' ठिकाणी भरती सुरू, असा करा अर्ज