Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या (Job Majha) शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. दापोली अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, नेव्हल शिप रिपेअर यार्ड (NSRY), महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे येथे विविध पदावर भरती करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज कसा करायचा हे जाणून घ्यायचे असल्यास ही बातमी सविस्तर वाचावी. 



दापोली अर्बन को-ऑप बँक लि.


पोस्ट - लिपिक


शैक्षणिक पात्रता - पदवीधर, MS-CIT


एकूण जागा - 10


वयोमर्यादा - 33  वर्षांपर्यंत


नोकरीचं ठिकाण - रत्नागिरी


ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 नोव्हेंबर 2022


तपशील - vamnicom.gov.in (या वेबसाईवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


-----------------------------------------------------------------


नेव्हल शिप रिपेअर यार्ड (NSRY)


पोस्ट - अप्रेंटिस (यात नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवारमध्ये अप्रेंटिस हवेत आणि नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड, गोवामध्ये अप्रेंटिस हवेत)


शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI


एकूण जागा - 180 (यात कारवारमध्ये 150 तर गोव्यात 30 अप्रेंटिस हवेत)


वयोमर्यादा - 21 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20  नोव्हेंबर 2022


तपशील - www.indiannavy.nic.in


-----------------------------------------------------------


महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई


पोस्ट - प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, आयटी अधिकारी, वसतिगृह वॉर्डन, अंतर्गत लेखा परीक्षक


शैक्षणिक पात्रता - Ph.D., पदव्युत्तर पदवी, M. Com/ CA/ MBA


एकूण जागा - 24


नोकरीचं ठिकाण - मुंबई


अर्ज पाठवण्याचा पत्ता - रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई, दुसरा मजला, MTNL - CETTM बिल्डिंग, टेक्नॉलॉजी स्ट्रीट, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई- 400076


अर्ज करण्याची शेवटची तारीक - 25 नोव्हेंबर 2022


तपशील - www.mnlua.ac.in


--------------------------------------------------------------


राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे


एकूण 280 जागांसाठी भरती निघाली आहे.


पोस्ट - सुपर स्पेशालिस्ट, दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल फिकॉलॉजिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, आहारतज्ञ, समुपदेशक, मानसोपचार परिचारिका, लेखापाल, MTS, तंत्रज्ञ आणि इतर पदे


शैक्षणिक पात्रता - DM/ MD/ BDS/ MBBS/ BAMS/ BUMS/ BHMS/ MCA/ MA/ BCA/ MSW/ GNM/ B.Sc.(नर्सिंग)/पदवीधर/ 10वी/ ITI/ 12वी/ DMLT (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)


एकूण जागा - 280


अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, चौथा मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 21 नोव्हेंबर 2022


तपशील - arogya.maharashtra.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Advertisement for Various district level post under National Health Mission in Thane या लिंकवर क्लिक करा. document लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)