Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

राष्ट्रीय इस्पात निगम लि.यात ITI पास उमेदवारांसाठी भरती निघाली आहे.पोस्ट - अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)शैक्षणिक पात्रता - संबंधित ट्रेडमध्ये ITI-NCVTएकूण जागा - 319 (यात फिटरसाठी 80 जागा, टर्नरसाठी 10 जागा, मशीनिस्टसाठी 14, वेल्डर (G & E) साठी 40 जागा, MMTM साठी 20 जागा, इलेक्ट्रिशियनसाठी 65 जागा, कारपेंटरसाठी 20 जागा, मेकॅनिकसाठी 10 जागा, मेकॅनिक डिझेलसाठी 30 आणि COPA साठी 30 जागा आहेत.वयोमर्यादा - 18 ते 25 वर्षऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 ऑगस्ट 2022तपशील - www.vizagsteel.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.

एलआयसी-हाऊसिंग फायनान्स लि.

पोस्ट - सहाय्यक/ Assitantशैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतून पदवीधरएकूण जागा - 50वयोमर्यादा - 21 ते 28 वर्षअर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 ऑगस्ट 2022तपशील - www.lichousing.com

दुसरी पोस्ट - सहायक व्यवस्थापक/ Assistant Managerशैक्षणिक पात्रता - पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी, मार्केटिंग/ फायनॅन्समध्ये MBA झालेले असल्यास प्राधान्य दिलं जाईल. अनुभव महत्वाचा आहे.एकूण जागा - 30वयोमर्यादा - 21 ते 28 वर्षऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 ऑगस्ट 2022तपशील - www.lichousing.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. job opportunities मध्ये संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

पंजाब नॅशनल बँकविविध पदांची भरती होत आहे.पोस्ट - ऑफिसर (फायर सेफ्टी) JMGS - Iशैक्षणिक पात्रता - B.E/B.Tech (फायर किंवा समतुल्य), 1 वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि विभागीय अधिकारी अभ्यासक्रम, 1 वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि सब-ऑफिसर कोर्स/स्टेशन ऑफिसर अभ्यासक्रम आणि 3 वर्षांचा अनुभवएकूण जागा - 23वयोमर्यादा - 21 ते 35 वर्षअर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 30 ऑगस्ट 2022तपशील - www.pnbindia.in

पोस्ट - मॅनेजर (सिक्युरिटी) MMGS-IIशैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, लष्कर/नौदल/हवाई दलात 5 वर्षांची सेवा असलेले अधिकारी किंवा किमान 5 वर्षांच्या सेवेसह केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (CAPF) उप-अधीक्षक किंवा सहायक कमांडंट किंवा समकक्ष रँक असलेले राजपत्रित पोलिस अधिकारीएकूण जागा - 80वयोमर्यादा - 21 ते 35 वर्षऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.अर्ज पाठवण्याचा पत्ता - CHIEF MANAGER (RECRUITMENT SECTION), HRD DIVISION, PUNJAB NATIONAL BANK, CORPORATE OFFICE, PLOT NO 4, SECTOR 10, DWARKA, NEW DELHI -110075.अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 30 ऑगस्ट 2022तपशील - www.pnbindia.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitments वर क्लिक करा. 4 ऑगस्टच्या जाहीर झालेल्या संबंधित पोस्टसंदर्भातल्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल. )