Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय पोस्ट ऑफिस येथे नोकरीच्या संधी आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
विविध पदांच्या 195 जागांसाठी भरती होत आहे.
पहिली पोस्ट – प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी
- शैक्षणिक पात्रता - 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, दोन वर्षांचा अनुभव
- एकूण जागा – 29
- वयोमर्यादा – 23 ते 32 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 8 जून 2022
- तपशील - www.mscbank.com
दुसरी पोस्ट – प्रशिक्षणार्थी लिपिक
- शैक्षणिक पात्रता – 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
- एकूण जागा – 166
- वयोमर्यादा – 21 ते 28 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही वाढवण्यात आली आहे. सुरुवातीला ही तारीख 25 मे होती आता ती वाढवून 8 जून 2022 करण्यात आली आहे.
- तपशील - www.mscbank.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. त्यात तुम्हाला जाहिरात आणि अर्ज करण्याची तारीख वाढवून देण्यात आल्याच्या दोन लिंक दिसतील. क्लिक करा.तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
बृहन्मुंबई महानगरपालिका
पोस्ट – सहाय्यक प्राध्यापक
- शैक्षणिक पात्रता - सुपर स्पेशालिटीसाठी डीएम/ एम.सी.एच., एमडी/एमएस/ डीएनबी पदवी, तीन वर्षांचा अनुभव, MS-CIT प्रमाणपत्र आणि एसएससी मराठी विषय घेऊन उत्तीर्ण
- एकूण जागा – 125
- वयोमर्यादा – 38 वर्षांपर्यंत
- नोकरीचं ठिकाण – मुंबई
- ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 6 जून 2022
- तपशील - www.portal.mcgm.gov.in
जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद
- पोस्ट – विशेष सहाय्यक सरकारी वकील
- शैक्षणिक पात्रता – कायद्याची पदवी
- एकूण जागा – 07
- नोकरीचं ठिकाण – औरंगाबाद
- मुलाखतीतून निवड होणार आहे.
- ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022
- तपशील - aurangabad.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर सूचनामध्ये भरतीवर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
मेल मोटार सर्व्हिस, मुंबई
- पोस्ट – कर्मचारी कार चालक
- शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण, हलके आणि जडवाहन चालक परवाना, तीन वर्षांचा अनुभव, मोटार तंत्रज्ञान आवश्यक
- एकूण जागा – 17
- नोकरीचं ठिकाण – मुंबई
- ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Senior Manager (JAG), Mail Motor Service, 134-A Sudam Kalu Ahire Marg, Worli Mumbai – 400018
- अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022
- तपशील - www.indiapost.gov.in (य़ा वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये 27 मे ला जाहीर झालेल्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)