Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड मुंबई


पोस्ट - सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक, मुख्य जोखिम अधिकारी (Assistant Manager, Manage, Chief risk officer CRO)



  • शैक्षणिक पात्रता- पदवीधर

  • एकूण जागा - 11 (यात सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी पाच जागा, व्यवस्थापक पदासाठी पाच जागा आणि मुख्य जोखिम अधिकारी पदासाठी एक जागा आहे.)

  • वयोमर्यादा - सहाय्यक व्यवस्थापकह, व्यवस्थापक पदासाठी 25 ते 35 वर्ष, मुख्य जोखिम अधिकारी पदासाठी 50 वर्षांपर्यंतची वयोमर्यादा आहे.

  • नोकरीचं ठिकाण - मुंबई

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जुलै 2022

  • तपशील - www.cbhfl.com  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित तीन पोस्टसंदर्भातल्या वेगवेगळ्या तीन लिंक्स दिसतील. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


डेक्कन एज्युकेशन सोसायटी


पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक



  • शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी

  • एकूण जागा - 96

  • नोकरीचं ठिकाण - पुणे

  • मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.

  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 16 जुलै 2022

  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - कॉलेज ऑफिस, इनवर्ड सेक्शन, मुख्य ऑफिस, फर्ग्युसन कॉलेज, पुणे - 411004

  • तपशील - www.despune.org  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Applications are invited for the posts of CHB Teachers for Fergusson College, Pune या लिंकमधली advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


सांगोला कॉलेज, सोलापूर


पोस्ट - शिक्षक



  • शैक्षणिक पात्रता - शासन, विद्यापीठ नियमानुसार

  • एकूण जागा - 35

  • नोकरीचं ठिकाण - सोलापूर

  • ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

  • मुलाखतीची तारीख - 18  जुलै 2022

  • मुलाखतीचा पत्ता - सांगोला कॉलेज, कडलास रोड, जिल्हा सोलापूर, सांगोला -  413307

  • तपशील - sangolacollege.org 


इंदिरा गांधी महिला महाविद्यालय, चंद्रपूर


पोस्ट - प्राचार्य, सहायक प्राध्यापक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथालय परिचर, शिपाई



  • शैक्षणिक पात्रता - प्राचार्य पदासाठी शासन आणि विद्यापीठ नियमानुसार, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी M.A./B.Ed., कनिष्ठ लिपिक पदासाठी पदवीधर, ग्रंथालय परिचर पदासाठी बारावी पास, संगणक ज्ञान, शिपाई पदासाठी दहावी/ बारावी पास.

  • एकूण जागा - 23

  • नोकरीचं ठिकाण -चंद्रपूर

  • मुलाखतीचा पत्ता - इंदिरा गांधी महिला महाविद्यालय, बँक ऑफ इंडिया समोर, घुग्गुस

  • मुलाखतीची तारीख - 17 जुलै 2022