Job Majha : दहावी आणि बारावी पास झालेल्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे. कोचीन शिपयार्ड ( Cochin Shipyard ), टाटा मेमोरियल सेंटर मुंबई आणि युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (Uranium Corporation of India ) विविध पदांवर भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
कोचीन शिपयार्ड लि.
पोस्ट : अप्रेंटिस (यात पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन- डिप्लोमा अप्रेंटिस )
शैक्षणिक पात्रता : पदवीधर अप्रेंटिससाठी इंजिनिअरिंगमध्ये पदवी आणि टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिससाठी इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा
एकूण जागा : 143
वयोमर्यादा : 18 वर्ष पूर्ण
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 डिसेंबर 2022
तपशील : https://cochinshipyard.in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. NOTIFICATION FOR ENGAGEMENT OF GRADUATE/TECHNICIAN (DIPLOMA) APPRENTICES UNDER APPRENTICES (AMENDMENT) ACT 1973 या लिंकवर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची notification दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (UCIL)
पोस्ट : अप्रेंटिस (यात फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक, मेकॅनिक डिझेल, सुतार, प्लंबर यांचा समावेश आहे.)
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा : 239
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2022
तपशील : ucil.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर jobs वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
टाटा मेमोरियल सेंटर मुंबई
पोस्ट : डेटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : 12 वी पास, संगणकाचा किमान ६ महिन्यांचा कोर्स किंवा MS-CIT प्रमाणपत्र, १ वर्षाचा अनुभव
एकूण जागा : 4
नोकरीचं ठिकाण : मुंबई
थेट मुलाखतीतून निवड होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : रुम नं. 205, दुसरा मजला, सेंटर फॉर कॅन्सर एपीडिमिओलॉजी, अॅडवान्स सेंटर फॉर ट्रिटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर, सेक्टर २२, खारघर, नवी मुंबई - ४१०२१०
मुलाखतीची तारीख : 21 नोव्हेंबर 2022
तपशील - www.actrec.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. advertisement number - CCE/Advt/1031/2022 यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)