ITBP Recruitment 2022 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी. इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) दलानं हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदांसाठी (ITBP Constable Recruitment 2022) अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होईल. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट itbpolice.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 186 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.  

भरतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती 

एकूण पदं : 186 पदंहेड कॉन्स्टेबल : 58 पदंकॉन्स्टेबल : 128 पदं

महत्त्वाच्या तारखा 

ऑनलाईन अर्ज करण्याच्या सुरुवातीच्या तारखा : 29 ऑक्टोबर 2022अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 नोव्हेंबर 2022

वयोमर्यादा 

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 वर्षे ते 25 वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता 

ज्या उमेदवारांना कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करायचा आहे. त्यांच्याकडे मान्यताप्राप्त मंडळाचे दहावी, बारावी उत्तीर्ण आणि ITI पास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण तपशील तपासू शकता.

वेतनश्रेणी 

हेड कॉन्स्टेबल पदांवर निवडल्या जाणार्‍या उमेदवारांचं वेतन 25,500 ते 81,100 रुपये प्रति महिना असेल. तसेच, ज्या उमेदवारांची कॉन्स्टेबल पदांवर निवड केली जाईल त्यांना 21,700 ते 69,100 रुपये वेतन दिलं जाईल.

निवड प्रक्रिया 

कॉन्स्टेबल पदांसाठी निवड होण्यासाठी उमेदवारांना पीईटी, पीएसटी, लेखी चाचणी आणि वैद्यकीय परीक्षा या टप्प्यांतून जावं लागेल.

कसा कराल अर्ज? 

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट itbpolice.nic.in वर जा.तेथे तुम्हाला "CLICK HERE TO APPLY ONLINE" या लिंकवर क्लिक करावे लागेल.त्यानंतर नोंदणी करा.फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.त्यानंतर उमेदवार ऑनलाईन अर्ज भरतात आणि सबमिट करतात.भविष्यातील अर्जाची छायाप्रत तयार करा जेणेकरून पुढे कोणतीही अडचण येणार नाही.

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Job Majha : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वाचा डिटेल्स