ISRO Jobs 2023: इस्रोमध्ये (ISRO) काम करण्याची इच्छा आहे? मग वाट कसली पाहाताय? झटपट अर्ज भरा. ISRO कडून भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार संस्थेत अनेक पदांवर भरती होणार आहे. या मोहिमेसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार vssc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. 14 नोव्हेंबरपासून अर्ज करण्याची विंडो उघडली आहे. इच्छुक उमेदवार भरती मोहिमेसाठी 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.


इस्रोच्या भरती मोहिमेद्वारे एकूण 18 पदं भरण्यात येणार आहेत. मोहिमेद्वारे इस्रोच्या 9 ड्रायव्हर पदांसाठी भरती केली जाणार आहे. ही पदं हलके वाहन चालक-ए आणि अवजड वाहन चालक-बी या पदांसाठी जारी करण्यात आली आहेत. 


ISRO Recruitment 2023: कोण करणार अर्ज? 


भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठी, उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळातून SSLC/SSC/Matriculation/दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यासोबतच अर्जदाराकडे वैध परवाना असणं आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला तीन वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असणं आवश्यक आहे.


पगार किती? 


इस्रोकडून जारी करण्यात आलेल्या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 19 हजार 900 रुपये ते 63 हजार 200 रुपये पगार दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात. 


कसा कराल अर्ज? 



  • स्टेप 1: सर्वात आधी उमेदवारांनी ISRO VSSC च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.

  • स्टेप 2: त्यानंतर होम पेजवरील ISRO VSSC Recruitment 2023 लिंकवर क्लिक करा. 

  • स्टेप 3: आता उमेदवारांनी आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी रजिस्टर करा.  

  • स्टेप 4: त्यानंतर तुमचे काही डिटेल्स भरावे लागतील. 

  • स्टेप 5: आता तुमचे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. 

  • स्टेप 6: त्यानंतर आवेदन शुल्क भरावं. 

  • स्टेप 7: शुल्क भरुन झाल्यानंतर अर्ज सबमिट करावा. 

  • स्टेप 8: आता अर्ज डाऊनलोड करावा

  • स्टेप 9: उमेदवार प्रिंटही काढू शकतात. 




अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.              


महत्त्वाच्या इतर बातम्या :


NTPC मध्ये 100 पदांसाठी भरती, मुलाखतीच्या आधारे निवड; 10 नोव्हेंबरपर्यंत शेवटची मुदत