मुंबई : सध्या देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्रात 17 हजार पोलीस भरतीसाठी (Police Bharti) साधारण 17 लाख अर्ज आले आहेत. अर्ज करणाऱ्यांमध्ये काही उच्चशिक्षित उमेदवारदेखील आहेत. रोजगारासाठी हेच तरूण वेगवेगळ्या वाटा शोधत आहेत. दरम्यान, आता महाराष्ट्रासह भारतातील वाहनचालकाला (ड्रायव्हर)  नोकरीसाठी थेट जर्मनीत (Jobs in Germany) जाण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यासाठी वाहनचालकांना जर्मन भाषेचं प्रशिक्षण देण्याची महाराष्ट्र सरकारची योजना आहे.


जर्मनीत नेमकी काय नोकरी आहे? 


 परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पण भाषाचे मर्यादा आणि संवाद कौशल्य नसल्यामुळे तरुण-तरुणी नोकरीसाठी परेशात जाऊ शकत नाहीत. पण आता जर्मनीत सध्या एकूण चार लाख वाहनचालकांची गरज आहे.  त्यामुलेच भारतातील एकूण चार राज्यांतील चालकांना जर्मन भाषा शिकवून तसेच योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना थेट जर्मनीत पाठवले जाणार आहे. 


महाराष्ट्रातील मंत्री जर्मनीच्या दौऱ्यावर


या प्रकल्पासाठी महाराष्ट्राच्या परिवहन विभागाने तयारी केली आहे. काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर तसेच काही अधिकारी हे जर्मनीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्रातील आर्थिक गुंतवणुकीवर चर्चा झाली. उदय सामंत यांनी मर्सिडिझ बेंझ या कंपनीच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली. लवकरच ही कंपनी महाराष्ट्रात एकूण तीन हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाली आहे. 


एकूण चार राज्यातील तरूणांना परदेशात नोकरीची संधी


मुळात जर्मनीमध्ये तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची वनवा आहे. त्यामुळे येथे मोठ्या मनुष्यबळाची गरज आहे. या देशात वाहनचालकांचीही कमी आहे. त्यामुळे भारतातील तरुणांना थेट जर्मनीत जाऊन वाहनचालक होण्याची नामी संधी आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या चार राज्यांतील तरुणांना वाहनचालकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तशी योजना आहे. त्यामुळे तरुणांना भविष्यात थेट परदेशात नोकरी मिळण्याची शक्यता व्यक्त झाली आहे.  


हेही वाचा :


10 वी पास असाल तरी मिळणार सरकारी बँकेत नोकरी; जाणून घ्या अर्ज कसा करावा? परीक्षा कधी होणार?


मोठी बातमी! जलसंधारण विभागातील 650 पदांसाठी होणार फेरपरीक्षा; अमरावतीतील गैरप्रकारामुळे निर्णय!


Job : मंदीच्या वातावरणातही AI, FMCG, ऑईल अँड गॅसमधील रोजगारामध्‍ये वाढ: नोकरी जॉबस्‍पीक