Indian Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वेने अप्रेंटिसशिप म्हणजेच मदतनीस आणि शिकाऊ पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. रेल्वेकडून 1033 पदांवर भरती करण्यात येणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या रिक्त पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र मिळवलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. ही भरतीसाठी निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट secr.indianrailways.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.


शैक्षणिक पात्रता
या भरती प्रकियेमध्ये अप्रेंटिसच्या विविध ट्रेडसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये वेल्डर, टर्नर, फिटर, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर, कॉम्प्युटर ऑपरेटर, प्रोग्राम असिस्टंट, आरोग्य आणि स्वच्छता निरीक्षक, मशीनिस्ट इत्यादींचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार 55 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असावेत. तसेच संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र असावे. हे प्रमाणपत्र NCVT किंवा SCVT द्वारे प्रमाणित केलेले असावे. 


वयोमर्यादा
या भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 15 वर्षे असावे आणि कमाल वयोमर्यादा 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे.


अर्ज कसा करायचा?
या पदांसाठीचे अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच 24 मे 2022 पूर्वी आवश्यक कागदपत्रे आणि तपशीलांसह अर्ज भरावा. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांच्या गुणवत्तेच्या आधारे अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. या यादीत निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान दरमहा एक निश्चित स्टायपेंड दिला जाईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :