Indian Navy Recruitment 2023सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलंय. जॉब माझा (Job Majha) विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय नौदलाने (Indian Navy) 8 डिसेंबर 2023 रोजी 910 विविध रिक्त पदांसाठी INCET अधिसूचना 2023 जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही. भारतीय नौदल भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 18 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज दाखल करु शकतात.


Indian Navy Recruitment 2023 : भारतीय नौदल भरती


एकूण रिक्त जागा : 910


Indian Navy Recruitment 2023 : रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता 


1) चार्जमन - 42


शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा गणितासह विज्ञान पदवी.


2) वरिष्ठ ड्राफ्ट्समन - 258


शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळाकडून मॅट्रिक पास किंवा त्याच्या समकक्ष


3) ट्रेडसमन मेट - 610


शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेतून 10वी उत्तीर्ण, संबंधित व्यापारातील मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) कडून प्रमाणपत्र”.


Indian Navy Recruitment 2023 : वयोमर्यादा 



  • चार्जमन - 18-25 वर्षे

  • सिनियर ड्रॉफ्ट्समन - 18-27 वर्षे

  • ट्रेड्समन मेट - 18-25 वर्षे


Indian Navy Recruitment 2023 : अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन


भारतीय नौदल भरतीच्या 910 रिक्त जागांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे. 18 डिसेंबरपासून अर्ज भरण्याची लिंक सक्रिय होईल.


Indian Navy Recruitment 2023 : महत्त्वाच्या तारखा 


अर्ज सुरू होण्याची तारीख : 18 डिसेंबर 2023


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : joinindiannavy.gov.in


भारतीय नौसेना भरतीबाबत अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Government Job Alert : सरकारी नोकरीच्या शोधात आहात? रेल्वे, बँकेसह विविध ठिकाणी बंपर भरती; सविस्तर माहिती वाचा