​India Post Jobs 2022 : तुम्ही जर दहावी पास किंवा पदवीधर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागानं 90 हजारांहून अधिक पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. त्यासाठी उमेदवार 23 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवार indiapost.gov.in या अधिकृत साइटवर या भरती मोहिमेशी संबंधित माहिती तपासू शकतात. 


India Post Jobs 2022 : रिक्त जागांचा तपशील 


भारतीय टपाल विभागानं काढलेल्या भरती मोहिमेद्वारे टपाल विभागात पोस्टमन, मेल गार्डसह 98,083 पदं भरण्यात येणार आहेत.


India Post Jobs 2022 : शैक्षिक योग्यता


अधिसूचनेनुसार, 10 वी / 12 वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवार या भरती मोहिमेसाठी अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत साईटची मदत घेऊ शकतात.


India Post Jobs 2022 : वयोमर्यादा 


या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 32 वर्षे दरम्यान असावे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सवलत दिली जाईल.


India Post Jobs 2022 : अशी असेल निवड प्रक्रिया 


या पदांसाठी उमेदवारांची निवड कौशल्य चाचणीद्वारे केली जाईल. 


India Post Jobs 2022 : वेतनश्रेणी 


निवडलेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन दिलं जाईल.


India Post Jobs 2022 : अर्ज शुल्क 


या भरती मोहिमेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावं लागणार नाही.


India Post Jobs 2022 : कसा कराल अर्ज? 


या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत साइटला भेट द्यावी आणि संबंधित माहिती आधी मिळवावी. त्यानंतरच उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज भरून तो मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, बंगळुरू-560001 कडे पाठवणं आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत साइटचा संदर्भ घेऊ शकतात.


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :