Bank Recruitment : बँकेत नोकरी करण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) ने एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु (Bank Recruitment) करण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत साईटला भेट देऊन सविस्तर माहिती पाहू शकता. दरम्यान, या भरती प्रक्रियेमध्ये 2100 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची मुदत 6 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.


या भरती प्रकियेद्वारे भारतीय औद्योगिक विकास बँकेमध्ये कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM) ग्रेड 'O' आणि एक्झिक्युटिव्ह सेल्स अँड ऑपरेशन्स (ESO) ची भरती केली जाईल. अभियानांतर्गत एकूण 2100 पदे भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा 30 आणि 31 डिसेंबर 2023 रोजी आयोजित केली जाईल. या भरती मोहिमेसाठी, उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा पूर्ण करण्यासाठी दोन तासांचा अवधी असणार आहे.


निवड कशी केली जाईल?


ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (JAM), ग्रेड 'O' आणि एक्झिक्युटिव्ह सेल्स अँड ऑपरेशन्स (ESO) या दोघांच्या निवड प्रक्रियेत ऑनलाइन चाचणी (OT), दस्तऐवज पडताळणी, JAM आणि प्री साठी वैयक्तिक मुलाखत (PI) यांचा समावेश आहे. त्याचबरोबर शेवटी वैद्यकीय तपासणीही केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत साईटची मदत घेऊ शकतात.


IDBI बँक भर्ती  प्रक्रियेसाठी कसा कराल अर्ज 


सर्व उमेदवारांनी प्रथम IDBI बँकेच्या अधिकृत साईटवर जा
यानंतर लिंकवर क्लिक करा
आता उमेदवार त्यांचे खाते तयार करू शकतात किंवा लॉग इन करू शकतात 
 यामध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक आणि व्यावसायिक तपशील प्रविष्ट करा
उमेदवार अनुभव प्रमाणपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करतात
त्यानंतर अर्जाची फी भरा 
यानंतर उमेदवार अर्ज सबमिट करतील 
त्यानंतर उमेदवार अर्ज डाउनलोड करतील 
शेवटी, उमेदवारांनी अर्जाची प्रिंट काढून घ्यावी 


महत्त्वाच्या बातम्या:


IB ACIO Notification 2023 : जगात धडकी भरवणाऱ्या आयबीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता, तारखेपासून ते परीक्षा शुल्कपर्यंत जाणून घ्या