IDBI Bank Recruitment 2022 : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. IDBI बँकमध्ये बंपर भरती निघाली आहे. 


आयडीबीआय बँकेत तब्बल एक हजार 544 जागांवर बंपर भरती निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असणार आहे. पगारही तीस हजारांपेक्षा जास्त असणार आहे. एग्जीक्यूटिव्ह आणि असिस्टेंट मॅनेजर ग्रेड ए पदांसाठी आयडीबीआय बँकेत 1544 जागांवर भरती निघाली आहे. यामध्ये एग्जीक्यूटिव्ह  पदाच्या 1044 तर असिस्टेंट मॅनेजर ग्रेड ए च्या 500 पदासाठी भरती होणार आहे. इच्छूक उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अखेरची तारीख 17 जून 2022 आहे.  भरतीबाबतची सर्व माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छूक उमेदरांना अर्ज करण्यापूर्वी ती सविस्तर वाचावी... 


कोणत्या जागांवर भरती?
एग्जीक्यूटिव्ह- 1,044 जागा
असिस्टेंट मॅनेजर ग्रेड ए - 500 जागा


योग्यता काय?
एग्जीक्यूटिव्ह आणि असिस्टेंट मॅनेजर पदासाठी अर्ज करणारा उमेदवाराची कोणत्याही शाखेतून आणि मान्यता असलेल्या विद्यापीठातून पदवी असावी.  


वयाची अट काय?
एग्जीक्यूटिव्ह पदासाठी उमेदरावाचे वय 1 एप्रिल 2022 पर्यंत 20 वर्षांपेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे.  तर असिस्टेंट मॅनेजर पदासाठी उमेदराचं वय कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्तीत 28 असावे.  


पगार किती मिळणार?
पहिल्या वर्षी 29000 , दूसऱ्या वर्षी 31000 आणि तीसऱ्या वर्षी 34000 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल.  


महत्वाचं - 
एग्जीक्यूटिव्ह पद हे एक वर्षाच्या  कॉन्ट्रॅक्टवर असेल.. त्यानंतर पुढे तुमच्या कामगिरीच्या आधारावर मर्यादा वाढवली जाईल. तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर उमेदवार  असिस्टेंट मॅनेजर ग्रेड ए पदासाठी पात्र होईल.  


असिस्टेंट मॅनेजर ग्रेड ए
असिस्टेंट मॅनेजर ग्रेड ए पदाची भरती PGDBF 2022-23 मध्ये एडमिशनच्या आधारावर होईल.  शॉर्टिस्टेड उमेदवारांना  बँकिंग आणि फायनांसमध्ये एका वर्षाच्या  पीजी डिप्लोमा कोर्ससह ट्रेनिंग दिली जाणार.. कोर्स संपल्यानंतर बँक त्या उमेदवारांना असिस्टेंट मॅनेजर ग्रेड ए पदावर नियुक्त करेल.