​ICG Assistant Commandant Recruitment 2022:  भारतीय तटरक्षक दलात भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. बारावी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे. भारतीय तटरक्षक दलातील असिस्टंट कमांडेट (Assistant Commandant) पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. भारतीय तटरक्षक दलाने याबाबतची एक अधिसूचना जारी केली आहे. 


या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती आणि अर्ज joinindiancoastguard.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांना 17 ऑगस्ट 2022 पासून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2022 आहे. 


भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडेटच्या 71 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामध्ये सर्वसाधारण गटासाठी 31 जागा, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी 4 जागा, ओबीसींसाठी 20 जागा, अनुसूचित जातींसाठी 6 जागा आणि अनुसूचित जमातींसाठी 10 जाग आहेत. 


शैक्षणिक पात्रता: 


भारतीय तटरक्षक दलातील विविध शाखेसाठी असिस्टंट कमांडेंट पदासाठी 12 वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवार अर्ज दाखल करू शकतात.


वयोमर्यादा 


या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराचा जन्म 1 जुलै 1997 ते 30 जून 2001 या दरम्यान झालेला असावा. शासकीय नियमांप्रमाणे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल. 


वेतन किती?


भारतीय तटरक्षक दलातील या निवड प्रक्रियेतून भरती झालेल्या उमेदवारांना 56 हजार 100 रुपये प्रति महिना इतके वेतन मिळेल. 


परीक्षा अर्ज शुल्क किती?


या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी शुल्क भरावे लागतील. या परीक्षेसाठी 250 रुपयांचे शुल्क भरावे लागेल. 


अर्ज कुठं करणार?


इच्छुक उमेदवारांना joinindiancoastguard.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरता येतील. अर्ज प्रक्रिया 17 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार असून शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2022 आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: